करिअरनामा ऑनलाईन – कोविड-19 मुळे यूएसमध्ये जावून शिकणं घेण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, ऑनलाइन अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. डेटा अॅनालिटिक्सपासून ते डिजिटल मार्केटिंगपर्यंत, अनेक महाविद्यालये आणि विद्यापिठांद्वारे ऑफर केलेले अनेक अल्प आणि दिर्घकालीन कोर्स ऑनलाइन उपलब्ध आहेत.
हार्वर्ड युनिव्हर्सिटी ते येल पर्यंत, येथे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ज्यांचा अभ्यास तुम्ही घरी बसून करू शकता आणि यूएस कॉलेजची पदवी मिळवू शकता.
फिनटेक ऑनलाइन शॉर्ट कोर्स – हार्वर्ड बिझनेस स्कूल –
कोर्स- ऑनलाइन
कोर्सचे फायदे- विद्यार्थी आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील परिवर्तनशील उपक्रम हाताळण्यास सक्षम होईल
कोर्सची फी- 2,13,485 रु.
मॉडर्न रोबोटिक्स, कोर्स 1- नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी
कोर्स- ऑनलाईन
कोर्सचे फायदे- रोबोट मोशनचा पाया, रोबोट कॉन्फिगरेशनशी संबंधित मूलभूत सामग्री, स्वातंत्र्याची डिग्री, सी-स्पेस टोपोलॉजी इत्यादींचा समावेश. अवकाशीय वेग आणि शक्तींना वळण आणि रेंच म्हणून कसे दर्शवायचे या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश
नेटवर्किंगचा परिचय – न्यूयॉर्क विद्यापीठ
कोर्स- ऑनलाईन
कोर्सचे फायदे- कॉम्प्युटर नेटवर्किंग, अॅप्लिकेशन लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, नेटवर्क आणि लिंक लेयर तसेच नेटवर्क सिक्युरिटी यांचे शिक्षण. नेटवर्कचे वर्णन करणे आणि नेटवर्कचे प्रमुख घटक ओळखणे, नेटवर्किंग ऍप्लिकेशन्स आणि HTTP, SMTP, आणि FTP सारख्या प्रोटोकॉलच्या तत्त्वांवर चर्चा करणे, पीअर टू पीअर नेटवर्कचे वर्णन करणे, राउटर कसे कार्य करतात, IP प्रोटोकॉल इत्यादींचे वर्णन करणे या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश.
क्रिप्टोकरन्सी – मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
कोर्स- ऑनलाईन
कालावधी- 6 आठवडे
कोर्सचे फायदे- क्रिप्टो प्रकल्पांच्या व्यवहाराचे मूल्यांकन करता येणार
कोर्स फी- 2, 13,485 रु.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com