करिअरनामा ऑनलाईन । जागतिक आर्थिक मंदीचा फटका मागील काही (Layoff) वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी अचानकच नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. आता दुसरीकडे आणखी एका नामवंत IT कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा दिला आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा (Layoff)
LiveMint ने सादर केलेल्या वृत्तानुसार Cognizant च्या Work From Home करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने ऑफिसमध्ये येऊन काम करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. वारंवार सूचना दिल्या जात असतानाही काही कर्मचारी अद्याप ऑफिसमध्ये येत नाहीत. त्यांच्याविरोधातच आता कंपनीनं ही कठोर भूमिका घेतली असून, त्यांना थेट नोकरीवरून काढण्याचाच इशारा दिला आहे.
कंपनीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येणं (Layoff) गरजेचं आहे. त्यांनी असं न केल्यास ही कृती कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करणारी कृती मानली जाईल. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. दरम्यान कॉग्निझंटसाठी भारतातील कर्मचारीवर्ग महत्वाचा असून वार्षिक अहवालानुसार कंपनीतील 3,47,700 कर्मचाऱ्यांपैकी 2,54,000 कर्मचारी एकट्या भारतातील आहेत. थोडक्यात भारत हे कॉग्निझंटसाठी महत्त्वाचं केंद्र असून, आता कंपनीच्या या निर्णयाकडे भारतातील कर्मचारीसुद्धा गांभीर्यानं पाहत आहेत; असं चित्र आहे.
मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी तणावात
सध्या चीनमध्ये काम करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या असंख्य कर्मचाऱ्यांवर याचे परिणाम होताना दिसत असून, कंपनीकडून या सर्व कर्मचाऱ्यांना इतर देशांमध्ये स्थलांतरीत होण्याच्या सूचना (Layoff) करण्यात आल्या आहेत.
वॉशिंग्टन जर्नलच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टकडून चीनमध्ये काम करणाऱ्या जवळपास 700 ते 800 कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या असून, त्यामधील अनेक कर्मचारी चीनचे नागरिक आहेत. अशा कर्मचाऱ्यांना कंपनीनं सध्या अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड अशा देशांमध्ये स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com