Law CET Admission 2024 : भावी वकिलांनो!! नॅशनल लॉ स्कूल्स प्रवेशासाठी अर्ज सुरू; 1 डिसेंबरला होणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशात विविध न्यायालयांमध्ये (Law CET Admission 2024) कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज नव्याने खटले दाखल होण्याच्या संख्येत भर पडत आहे. या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. विधी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षणदले, सरकारी व निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, विधी महाविद्यालयात अध्यापन, वकिली व्यवसाय, पत्रकारिता, लिगल प्रोसेस आऊटसोर्सिंग अशा अनेक क्षेत्रांत संधी आहे. कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही गुण असणे आवश्यक आहे जसे उत्कृष्ट मसुदा लेखन, सादरीकरण व संवाद कौशल्य, चातुर्य, आत्मविश्वास व उत्तम आकलन क्षमता आदि. या पार्श्वभूमीवर लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर 3 वर्षांचा किंवा बारावीनंतर 5 वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते. अशा वकील होवू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे.

लॉ स्कूल्स मधील CET साठी 15 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज
लॉ शिक्षणासाठी देशात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या 24 नॅशनल लॉ स्कूल्स मधील 12 वीनंतर पाच वर्षांच्या पदवी कोर्सच्या प्रवेशासाठी दि. १ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्तरावर सीईटी (CET) परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने www. consortiumofnlus. ac. in या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२४आहे. लॉ पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या नॅशनल लॉ स्कूल्समध्ये एक वर्षाच्या एल एल एम पदवीसाठी प्रवेश मिळू शकतो. त्यासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा हेच आहे. या २४ नॅशनल लॉ स्कूल्स पैकी तीन महाराष्ट्रात असून ती मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आहेत.

असं आहे परीक्षेचं स्वरूप (Law CET Admission 2024) –
1. लॉ शिक्षणासाठी देशात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या २४ नॅशनल लॉ स्कूल्स मधील बारावीनंतर पाच वर्षांच्या पदवी कोर्सच्या प्रवेशासाठी १ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्तरावर सीईटी परीक्षा होणार आहे.
2. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
3. 120 मार्कांच्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन तासात 120 प्रश्न सोडवावे लागतात.
4. यामध्ये लॉजिकल रीझनिंगवर २० टक्के प्रश्न, लीगल रीझनिंगवर २५ टक्के प्रश्न, सामान्यज्ञानावर २५ टक्के प्रश्न व इंग्रजीवर २० टक्के प्रश्न व गणितावर १० टक्के प्रश्न असतील.
5. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण (पाव गुण) वजा होईल.
6. ही परीक्षा इंग्रजी भाषेतच देता येते. यंदा बारावीत असलेले विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com