करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे.
अमेझॉन कंपनीने साधारण २० हजार लोकांना तात्पुरत्या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. पुढच्या सहा महिन्यात ग्राहकांची ऑनलाईन गर्दी वाढणार आहे. त्यांना कोणत्याच अडथळ्याशिवाय सेवा पुरविण्यासाठी भविष्याचा विचार करून मनुष्यबळ आतापासूनच वाढवले जात असल्याचे अमेझॉन ने सांगितले आहे.
ई ग्रोसरी सेगमेंटमधील बिग बास्केट, ग्रोफर्स, पेटीएम मॉल, फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कॅटेगरीमधील भारत पे, ऑनलाईन मांसाहारासाठी लिशिअस, ऑनलाईन रिअल इस्टेट कॅटेगरी नोब्रोकर डॉट कॉम, लॉजिस्टिक कॅटेगरीमधील ईकॉम एक्सप्रेस यांनी नुकतेच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. येत्या काही दिवसात ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस येणार असल्याचे चित्र आहे त्यासोबतच रोजगार उपलब्ध होणार आहेत.