Kendra Pramukh Bharti 2023 : राज्यात केंद्र प्रमुखांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन । ​दि २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये केंद्र प्रमुख (Kendra Pramukh Bharti 2023) भरती परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख संकेतस्थळावर कळविण्यात येईल. यापूर्वी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने www.mscepune.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दि. 8 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना फी भरणे अनिवार्य आहे. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा – (Kendra Pramukh Bharti 2023)
1. वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
3. ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
4. सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ०८/१२/२०२३ रोजी पर्यंत सुरु राहील. त्यानंतर ही लिंक बंद केली जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
6. विहीत पध्दतीने (Kendra Pramukh Bharti 2023) अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

सूचना – केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023 आवेदनपत्र भरताना येणार्‍या अडचणीसाठी [email protected] या ईमेल वरती संपर्क साधावा .
काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates REOPEN
1. Commencement of on-line registration of application 06/06/2023 01/12/2023
2. Closure of registration of application 15/06/2023 08/12/2023
3. Closure for editing application details 15/06/2023 08/12/2023
4. Last date for printing your application 30/06/2023 23/12/2023
5. Online Fee Payment 06/06/2023 to 15/06/2023 01/12/2023 to 08/12/2023

 

 

 

 

 

 


काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mscepune.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com