करियरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानात होत असणारे बदल आणि मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्र वाढीला लागल्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तरुणांसाठी नव्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. Jobs In 2025 जॉब अँड टॅलेंट प्लॅटफॉर्मच्या नव्या रिपोर्टनुसार 2025 या एका वर्षात नोकऱ्या देण्याच्या प्रमाणात 9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची आनंददायक बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञानाशी निगडित कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांना मोठी मागणी असल्याची माहिती देखील या अहवालातून समोर आली आहे.
कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या जास्त संधी?
- अहवालातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आयटी, रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
- क्वान्टम एप्लीकेशन, एआय, सायबर सिक्युरिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे.
- रिटेल मिडिया नेटवर्क, एआय संचालित ई-कॉमर्स, एचआर, डिजिटल सर्व्हिसेस या क्षेत्राचे स्वरुप देखील बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. Jobs In 2025
AI आव्हान नव्हे संधी
- Artificial Inteligence मुळे जॉब जातील अशी भीती व्यक्त केली जात असली तरी ती वस्तुस्थिती नाही. याउलट रोजगाराच्या संधी दुपटीने वाढणार असून फक्त त्याचे स्वरूप बदलणार आहे.
- हे नवीन तंत्रज्ञान शिकून घेतल्यास बेरोजगार राहण्याची भीती राहणार नाही. तसेच आणखीन कार्यक्षमपणे काम करता येण शक्य होणार आहे.
2023 आणि 2024 या मागील दोन वर्षांच्या आकडेवारीची तुलना करून पाहिल्यास 2024 मध्ये रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढलं होतं. येणाऱ्या वर्षात मात्र रोजगाराच्या संधी कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र विविध विद्यापीठ आणि संशोधन अभ्यासातून याउलट नोकरीच्या संधी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत समोर येत आहेत. Jobs In 2025
अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.