Job Notification : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी!! टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे (Job Notification) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून निम्न श्रेणी लिपिक, परिचारिका ‘अ’ ही  पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई

भरली जाणारी पदे –

निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk)

परिचारिका ‘अ’ (Nurse ‘A’)

पद संख्या – 140 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)

  • निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान पदवीधर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये एमएस-सीआयटी किंवा किमान 3 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना 3 महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात आली आहे. (Job Notification)

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • परिचारिका ‘अ’ (Nurse ‘A’) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

50 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये 1 वर्षांचा क्लिनिकल अनुभव किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग)

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (Job Notification) किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) – 19,900/- रुपये दरमहा

परिचारिका ‘अ’ (Nurse ‘A’) – 18,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे – (Job Notification)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=19545 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com