करिअरनामा ऑनलाईन। सोशल मीडियावर दर दिवशी काही ना काही चर्चेत येत असतं. काही (Job News) गोष्टी मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर ‘Quiet Quitting’चा एक आगळा वेगळा ट्रेंड व्हायरल होतोय. तुम्हाला माहिती आहे का Quiet Quitting म्हणजे काय? आणि हा ट्रेंड आता एवढा का व्हायरल होतोय?
लॉकडाऊननंतर नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे अनेक कारणे समोर आली आहेत. मग कामाचं प्रेशर असो की जॉबचा ओव्हर टाईम किंवा बदलतं जीवनमान, या सर्व कारणांमुळे जॉब सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. एवढचं काय तर वर्क फ्रॉम होममुळे आता ऑफीसमध्ये (Job News) कामाला येणे लोकांना न परवडण्यासारखे झाले आहेत. कौटुंबिक जबाबदार्या असो की राहणीमानाचा वाढता खर्च यामुळे पगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्यामुळेही लोक नोकरी सोडताहेत. यावर उपाय म्हणून Quiet Quittingचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे.
काय आहे Quiet Quitting? (Job News)
सतत डेडिकेशनने नोकरी करणाऱ्यांनी थोडं डेडिकेशन कमी करावं. यालाच क्वाएट-क्विटिंग (Quiet Quitting) असं म्हणतात.
काही लोक असे असतात की ज्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करवून घेतले जातात . यामध्ये केवळ नोकरीत टिकून राहण्यासाठी किंवा बॉसला इम्प्रेस करण्यासाठी तसेच प्रमोशन मिळवण्यासाठी अधिक काम केलं जातं. या गोष्टीला आळा घालण्यासाठी तसेच तुम्हाला जितके पैसे दिले जातात तितकंच काम करा आणि जास्तीचं काम अजिबात करू नका, हा या ट्रेंडमागचा उद्देश आहे.
Quiet Quitting ट्रेंड हा 2021 मध्ये आलेल्या Great Resignation ट्रेंड सारखाच (Job News) सध्या व्हायरल होतोय. टिकटॉकवर @zaidleppelin या युजरपासून हा ट्रेंड सुरू झाला. सध्या हा ट्रेंड खुप व्हायरल होत असून नेटकरी या वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com