Job News : इकडे लक्ष द्या!! केंद्र सरकार मेगा भरती करण्याच्या तयारीत; रहा अलर्ट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार (Job News) आहे. केंद्र सरकारने बँकांसह वेगवेगळ्या सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. लवकरच मेगा भरती निघण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बैठक बोलावली होती. यामध्ये मेगा भरती योजनेवर चर्चा झाली असल्याचे समजते.

गेल्या आठवड्यात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

बँकेसोबत इतर सरकारी विभागातील रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी मंथली हायरिंग प्लॅन तयार करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षांत सरकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता (Job News) भासत आहे. त्यामुळे पूर्वीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भर येत आहे. या पार्श्वभुमीवर एकूण 10 लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.

त्यामुळे तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आताच अभ्यासाला लागा, सरकारी वेबसाईटवर रिक्त पदांच्या जाहिराती पाहा तिथून तुम्हाला याबाबत माहिती मिळू शकते. कोणत्या क्षेत्रात किती भरती होणार याबाबत अजून माहिती समोर आली नाही. मात्र येत्या काळात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com