करिअरनामा ऑनलाईन । देशातील कंपन्या आता पुन्हा एकदा (Job Hiring in 2024) मेगाभरती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 37 टक्के कंपन्या नोकर भरती करणार आहेत, असं एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. यातील सर्वात जास्त नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उपलब्ध होतील. तसंच मार्च 2024 पर्यंत देशात सतत नव्या नेमणुका सुरु राहतील; असंही या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.
कोरोनातून उभारी घेत देश सध्या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. शेअर मार्केट देखील दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. देशाच्या जीडीपीबाबत (GDP) देखील आंतरराष्ट्रीय संस्था चांगले अंदाज वर्तवत आहेत. या सगळ्या सकारात्मक परिस्थितीत आता रोजगरची चांगली संधी निर्माण होणार; असं चित्र आहे.
अनेक कंपन्या नोकरी देण्यासाठी सज्ज
देशात नोकरी देण्यासाठी सज्ज असणाऱ्या कंपन्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यासोबतच जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत भारतात यावर्षी सर्वाधिक हायरिंग होणार असल्याचा अंदाजही या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
भारत नंबर वन (Job Hiring in 2024)
रोजगार निर्मितीच्या बाबतीत भारत आणि नेदरलँड्स सर्वात पुढे आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोस्टारिका आणि अमेरिकेचा नंबर लागतो. सर्वाधिक नोकऱ्या फायनान्स (Job Hiring in 2024) आणि रिअल इस्टेट क्षेत्रात निर्माण होणार असून, त्याखालोखाल आयटी, कंझ्यूमर गुड्स आणि सर्व्हिसेस सेक्टरचा क्रमांक लागतो. एनर्जी किंवा युटिलिटी सेक्टरमध्ये जास्त नोकऱ्या तयार होण्याची शक्यता नसल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
लेऑफ करण्यापेक्षा नोकऱ्या देण्यावर भर
या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की लेऑफ करण्याच्या विचारात असणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत नोकरी देण्याचा विचार करणाऱ्या कंपन्या अधिक आहेत. मॅनपॉवर ग्रुपचे एमडी संदीप गुलाटी यांच्यामते स्थानिक मागणी वाढत आहे. परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे, आणि राजकीय स्थैर्य निर्माण होत आहे. त्यामुळे भारत प्रगती पथ्यावर आहे; असंही ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com