JEE Mains 2024 : जेईई परीक्षेचे नियम बदलले; आणखी कडक नियमांत द्यावा लागणार पेपर

JEE Mains 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Mains 2024) महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड अवघड परीक्षा समजली जाते. आता जेईई (JEE) मुख्य परीक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. याधर्तीवर आता परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक नियमावलीनुसार आता शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही टॉयलेट ब्रेकनंतर पुन्हा तपासणी आणि बायोमेट्रिक्स करावे लागणार आहे.

जेईई मेन परीक्षा दि. 24 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या वर्षीच्या जेईई मेन परीक्षेत 2024 मध्ये विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. प्रथमच, JEE Mains साठी अर्जांची संख्या 10 लाखाच्या पुढे गेली आहे. परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी सुमारे 12.3 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. एप्रिलच्या सत्रात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात घेतली जाणारी ही परीक्षा काही दिवसातच होणार आहे. NTA ने JEE Mains परीक्षा 2024 बाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केले आहेत. यानुसार परीक्षेदरम्यान उमेदवार, शिक्षक, अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीने टॉयलेट ब्रेक घेतल्यास त्यांना परत येऊन पुन्हा (JEE Mains 2024) तपासणी करावी लागेल. याबरोबर त्यांचे बायोमेट्रिक्सही पुन्हा तपासले जातील. विद्यार्थी, कर्मचारी यांची पुन्हा तपासणी आणि बायोमेट्रिक्स केल्यानंतरच तो परीक्षागृहात प्रवेश करू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com