JEE Main Exam 2024 : JEE परीक्षेची तारीख जवळ आली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

JEE Main Exam 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात (JEE Main Exam 2024) येणाऱ्या दुसऱ्या सत्रातील JEE Main परीक्षा येत्या गुरुवारी दि. 4 पासून सुरू होत आहे. देशासह विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

असं आहे परीक्षेचे वेळापत्रक
देशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी JEE मेन ही परीक्षा NTA मार्फत घेण्यात येते. दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमासाठी दि. ४, ५, ६, ८, ९ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. या (JEE Main Exam 2024) कालावधीत होणारी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रामध्ये होणार आहे. बी.आर्च, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी दि. १२ एप्रिल रोजी ही परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12:30 या कालावधीत घेतली जाईल.

या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असणार आहे; हे विद्यार्थ्यांना (JEE Main Exam 2024) पाहता येणार आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच दिले जाणार आहे; असे NTA ने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.nta.ac.in आणि https://jeemain.nta.ac.in/ या संकेतस्थळावर संपर्क साधा; असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com