करिअरनामा ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षेच्या जानेवारी २०२३ सत्रासाठी (JEE Main 2023) मुलींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असल्याचं चित्र आहे. यामध्ये एकूण 8.6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये जुलै २०२२ च्या तुलनेत ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ६ लाखांहून अधिक म्हणजे जवळपास ७० टक्के नोंदणी पुरुष उमेदवारांची आहे. त्यामुळे या परीक्षेच्या नोंदणीमध्ये पुरुषांचे वर्चस्व कायम आहे. मात्र, या परिक्षेसाठी पहिल्यांदाच ३० टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जी २०२२ च्या तुलनेत किरकोळ वाढ म्हणजेच २.५ लाख ते २.६ लाख इतकी आहे.
प्रवर्गानुसार, सर्वसाधारण उमेदवारांची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१.८ टक्क्यांवरुन ३८.३ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. दुसरीकडे, ओबीसी उमेदवारांची (JEE Main 2023) संख्या ३५.७ टक्क्यांवरुन ३७.१ टक्क्यांवर गेली आहे, तर सामान्य-आर्थिकदृष्ट्या दुर्बल (GEN-EWS) उमेदवारांची संख्याही ९% टक्क्यांवरुन ११.६% टक्के इतकी वाढली आहे.
महाराष्ट्राची आघाडी
राज्यानुसार या उमेदवार नोंदणीमध्ये, १ लाख ३ हजार ३९ म्हणजेच एकूण नोंदणीच्या जवळपास १२ टक्क्यांनी महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश ९९ हजार ७१४ (११.६%) आणि आंध्र प्रदेश ९१ हजार ७९९ (१०.६%) इतकी नोंदनी झाली आहे. तर तेलंगणा (JEE Main 2023) ८६ हजार ८४० आणि राजस्थानमधून ५९ हजार ४४१ उमेदवारांची नोंद झाली आहे. वरील राज्य वगळता इतर राज्यातील नोंदनी ही ५० हजारांपेक्षा कमी आहे.
शहरांच्या आकडेवारीनुसार दिल्ली ३६,५३० उमेदवारांसह आघाडीवर आहे, त्यानंतर हैदराबाद/सिकंदराबाद (३२,२४६) आणि कोटा (२४,२५३) अशी अनुक्रमे आहेत. एनआयटी आणि आयआयआयटी सारख्या केंद्रीय अनुदानीत संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग अंडरग्रेजुएट जेईई (अॅडव्हान्स) प्रवेश पात्रता परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहे.
भारताबाहेर १८ शहरांमध्ये होणार परीक्षा (JEE Main 2023)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने डिसेंबर रोजी दिलेल्या सूचनेमध्ये ३१ जानेवारी ही परीक्षेची शेवटची तारीख असल्याचे सांगितले होते, तर शनिवारी जारी केलेल्या नवीन सुचनेमध्ये २७ जानेवारी रोजी कोणतीही परीक्षा होणार नसून १ फेब्रुवारी रोजी पेपर १ (BTech/ BE programmes) होईल असं सांगण्याच आलं आहे.
NTA नुसार, ही टेस्ट देशातील २९० शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १८ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ज्यामध्ये वॉशिंग्टन डीसी, मॉस्को, हाँगकाँग, सिंगापूर आणि (JEE Main 2023) दुबईसह अनेक देशांचा सहभाग आहे. शिवाय इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
असं आहे परीक्षेचे स्वरूप
संगणक-आधारित MCQ (पेपर ३ वगळता) प्रत्येक दिवशी दोन सत्रांमध्ये परिक्षा घेतली जाईल. पेपर १ बीटेक/बीई प्रोग्रामसाठी, पेपर २ आर्किटेक्चर बॅचलरसाठी (Bachelor’s in architecture) आणि पेपर ३ बॅचलर इन प्लॅनिंगसाठी (Bachelors in planning. ) आहे. तर एकूण उमेदवारांपैकी २१,५५१ जणांनी पेपर १ आणि २ या दोन्हीसाठी नोंदणी केली आहे. तर तीन्ही पेपरसाठी १६,७८० उमेदवारांनी नोंदणी केली असून पेपर १ साठी ८.२ लाखांहून अधिक उमेदवारांनी (JEE Main 2023) नोंदणी केली आहे. तर JEE (Main) चे दुसरे सत्र ६ ते १२ एप्रिल २०२३ या कालावधीत पार पडणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com