करिअरनामा ऑनलाईन – अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE Advanced Exam 2022 तारीख वाढवली आहे. या परीक्षेची नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याद्वारे याआधी जेईई परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार होती. आता जेईईची परीक्षा येत्या 28 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवीन वेळापत्रक jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. या परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरती भेट द्यावी. जेईई परीक्षेचे दोन पेपर घेण्यात येणार आहेत.पहिला पेपर 9 ते 12 या वेळेमध्ये असेल तर दुसरा पेपर हा 2.30 ते 5.30 या वेळेमध्ये होणार आहे.
ऑगस्टमध्ये होणाऱ्या जेईई परीक्षेचा निकाल सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. उत्तरपत्रिका 1 सप्टेंबर रोजी वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. 3 सप्टेंबर रोजी तात्पुरत्या उत्तर पत्रिका वेबसाईटवरती दिसतील. 11 सप्टेंबरला शेवटची उत्तरपत्रिका बघायला मिळेल. 11 सप्टेंबर रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com