करिअरनामा ऑनलाईन । जेईई अॅडवान्सच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 3 जूलैला होणार होत्या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलल्यात आल्या आहेत. आता सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 जूलैपासून होणार आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप सुरु असताना परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार का, याबाबत साशंकता होती. त्यामुळे या प्रश्नावर आता उत्तर मिळाले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेलं नाहीय. याशिवाय जेईई अॅडवान्स परीक्षा पुढे ढकलल्या जाव्या अशी मागणी अनेकांकडून होत होती. अखेर सरकारने 3 जूलैला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक हे खूप तणावाखाली आहेत.
देशभरात दुसरी लाट खूप जास्त प्रमाणात आल्यामुळे अनेक राज्यांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या तर काही परीक्षा पुढे ढकलल्या. राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा (एनटीए) मे महिन्याअखेर घेण्यात येणारी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्झाम) परिक्षाही पुढे ढकलण्यात आली असून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सुचना जारी केली आहे. अनिश्चित काळासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com