बेरोजगारांसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट ! खाजगी क्षेत्रात ७ लाख नोकऱ्या ; पुणे मुबंईत वाढत्या संधी

करिअरनामा । चालू वर्षात खासगी क्षेत्रात सात लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या वेतनातही आठ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एका सर्वेक्षणात ही बाब नमूद करण्यात आली आहे. ‘माय हायरिंग क्लब डॉट कॉम’ आणि ‘सरकारीनोकरी डॉट इन्फो’ यांच्या नोकरीविषयक सर्वेक्षणात कंपन्या भरतीसाठी उत्सुक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सर्वाधिक नोकऱ्यांची निर्मिती करणाऱ्या शहरांमध्ये बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद अहमदाबाद आणि पुण्याचा समावेश आहे. या आठ शहरांमध्ये एकूण ५,१४,९०० नोकऱ्यांची निर्मिती होण्याची
शक्यता आहे.

सर्वेक्षणामध्ये नमूद केल्यानुसार २०२० मध्ये सर्वाधिक रोजगार ई-कॉमर्समध्ये (१,१२,०००) निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि आधारित सेवांमध्ये (१,०५,०००), आरोग्य क्षेत्रामध्ये (९८,३००), एफएमसीजी (८७,५००), उत्पादन (६८,९००) आणि बँकिंग, वित्तीय तसेच विमा क्षेत्रात (५९,७००) रोजगार निर्मिती
होण्याची शक्यता आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]