करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) होतकरू (ISRO Free Education) शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ISRO आता विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. इयत्ता 8 वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. इस्रोच्या स्पेस क्युरिऑसिटी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो. त्याचप्रमाणे NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. इस्रोच्या विविध केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक हे वर्ग घेणार आहेत.
शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सहज अवगत होईल (ISRO Free Education) अशी सोपी भाषा चित्र आणि अॅनिमेशनचा वापर या अभ्यासक्रमात केला जाणार आहे यात रिमोट सेन्सिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (EMR) जिओ स्टेशनरी आणि सूर्य-समकालिक उपग्रह रिमोट सेन्सरचे प्रकार आणि मल्टीस्पेक्ट्रल स्कैनर या सारख्या विषयांचा समावेश असेल,
असा करा अर्ज – (ISRO Free Education)
इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी या https://jigyasa.iirs.gov.in/login अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. इथे विद्यार्थ्यांनी तुम्हाला विचारलेली काही महत्वाचे तपशील भरायची आहेत विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहितीबरोबरच शाळेचा तपशीलही विचारले (ISRO Free Education) जातील. तुमची निवड झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख आणि अभ्यासक्रम तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com