Ishan Kishan : शिक्षण थांबवले पण क्रिकेटचा नाद सुटला नाही; वाचा भारताचा आघाडीचा बॅट्समन ईशान किशन कितवी शिकला?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक (Ishan Kishan) झळकावणाऱ्या ईशान किशनने खेळासाठी शाळा सोडली. इशानची क्रिकेटची आवड पाहून शिक्षकही हैराण झाले होते. वारंवार वर्गात उभे राहिल्यानंतरही इशान मैदानावर जाणे कमी करीत नव्हता. त्यामुळे अभ्यास आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही हे शिक्षकांनी त्याला स्पष्टच सांगितले. आपण खेळासाठी अभ्यास सोडू शकतो असे ईशानने शिक्षकांना सांगितले होते. त्यानंतर त्याने क्रिकेटसाठी शाळा सोडली होती. ईशानला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड आहे. त्याची क्रिकेटची आवड एवढी होती की तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. त्याच्या या आवडीमुळे तो अभ्यासात मागे पडला.

Ishan Kishan

‘असा क्रिकेटवेडा पाहिला नाही’; – यशस्वी सिंग

ईशान किशनने पटनाच्या दिल्ली प्रायमरी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पटना येथील कॉलेजमधून त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. “मी ईशानसारखा क्रिकेटप्रेमी (Ishan Kishan) कधीच पाहिला नाही. क्रिकेटसाठी तो खाणे-पिणे देखील विसरुन जायचा. त्याला क्रिकेटपेक्षा काहीही महत्त्वाचं नाही असं वाटत होतं. तो खेळण्यासाठी पाटण्याहून रांचीला कधी पोहोचायचा आणि वर्गात कधी यायचा हे कळत नसे;” असे ईशानची बालमैत्रीण यशस्वी सिंग सांगते.

ईशानच्या क्रिकेट वेडामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यानंतरही ईशानला त्रास झाला नाही कारण त्याची बॅट एक ना एक दिवस भारतासाठी इतिहास घडवेल हे त्याला माहीत होते असेही यशस्वी सांगते.

Ishan Kishan

अन् शाळा सोडावी लागली (Ishan Kishan)

यशस्वी सांगते की ती डीपीएस पब्लिक स्कूलमध्ये इशानसोबत नववीच्या वर्गात शिकत होती. ईशानचे क्रिकेटचे वेद कमी होत नव्हते. यामुळेच त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर इशानने फुलवारी येथील एका खासगी शाळेतून मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

Ishan Kishan

वयाच्या 7 व्या वर्षी बॅट घेतली हातात

इशानने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी बॅट हातात घेतली. इथूनच त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. ईशान सध्याचा सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि फलंदाज आहे. तो झारखंडकडून (Ishan Kishan) रणजी खेळायचा. प्रशिक्षक आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ईशानची प्रतिभा फुलली आणि त्याला Under-19 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com