करिअरनामा ऑनलाईन । हरियाणाची रहिवासी असलेली पूजा यादव परदेशातील (IPS Success Story) नोकरी सोडून मायदेशी परतली. UPSCची तयारी करून ती IPS झाली. सध्या तिची पोस्टिंग गुजरातमध्ये आहे. प्रसिद्ध SP डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूजाने प्रशिक्षण घेतले. यानंतर बनासकांठाच्या थराडमध्ये ASP म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. ती थरारची पहिली महिला IPS बनली.
संघर्ष थांबत नव्हता
पूजाने आयुष्याच्या सुरुवातीपासून खूप संघर्ष पाहिला आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. अशा परिस्थितीत पूजाने अभ्यासासाठी शालेय विद्यार्थ्यांचे (IPS Success Story) ट्युशन घेतले. यानंतर तिने रिसेप्शनिस्टचे काम केले. दरम्यान, बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तिला कॅनडामध्ये नोकरी मिळाली आणि ती भारतातून निघून गेली. जर्मनीला गेली आणि तिथे तिने नोकरी केली.
भारतासाठी योगदान देण्याची इच्छा (IPS Success Story)
जर्मनीच्या विकासात आपण हातभार लावतोय हे तिथे नोकरी करताना तिच्या लक्षात आले. तिला भारतात येऊन आपल्या देशासाठी काहीतरी करायचे होते. त्यामुळे जर्मनीतील नोकरी सोडून मायदेशात परत येऊन तिने UPSC ची तयारी सुरू केली.
दुसऱ्या प्रयत्नात IPS झाली
पूजाला UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात अपयश आले. पण या अपयशाने न डगमगता पुजाने अभ्यास सुरूच ठेवला. कठोर मेहनत घेवून तीने 2018 मध्ये UPSC ची परीक्षा (IPS Success Story) उत्तीर्ण केली. अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात ती IPS झाली. 2021 मध्ये तिने IAS अधिकारी विकल्प भारद्वाजसोबत लग्न केले. विकल्प हे 2016 कॅडरचे अधिकारी आहेत.
एक धाडसी महिला अधिकारी
थराडमध्ये पोस्टिंग असताना पूजाच्या कामाचे खूप कौतुक झाले. थराड हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. त्याची एक सीमा पाकिस्तानची आणि दुसरी राजस्थानची आहे. हा परिसर जुगाराचा अड्डाही मानला जातो. पूजाने या परिसरातून कोट्यवधी रुपयांची दारू जप्त केली आहे. तीच्या धाडसी (IPS Success Story) कारवायांमुळे गुन्हेगारांचा थरकाप उडतो. IPS पदापर्यंत पोहचताना करिअरचे अनेक टप्पे पाहणाऱ्या पूजाचा प्रवास युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com