करिअरनामा ऑनलाईन । हरियाणात तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी (IPS Success Story) संगीता कालिया यांची गणना वेगवान महिला अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांचे वडील पोलीस खात्यात सुतार होते. आयपीएस होण्यासाठी त्यांनी सहा नोकऱ्या सोडल्या. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्या भाजपच्या मंत्र्याशी भिडल्या आणि त्यांना शिक्षा देखील झाली. जाणून घ्या कोण आहे ही धगधगती अधिकारी.
आम्ही बोलतोय त्या महिला एसपीबद्दल ज्यांचा एका बैठकीत मंत्री अनिल विज यांच्याशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. महिला IPS अधिकारी संगीता कालिया या सध्या रेल्वेत एसपी म्हणून कार्यरत आहेत.
मंत्र्यासोबत वाद अन् नंतर बदली
संगीता या त्याच अधिकारी आहेत ज्यांचा फतेहाबादमध्ये 2015 रोजी आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याशी वाद झाला होता. त्यावेळी अनिल विज हे तिथल्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष होते. अमली पदार्थांच्या विक्रीशी संबंधित तक्रारीवर विज यांनी संगीता कालिया यांची प्रतिक्रिया मागितली. तेव्हा संगीता कालिया (IPS Success Story) यांनी उत्तर दिले की, आम्ही एका वर्षात दारू तस्करांवर अडीच हजार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस कोणालाही गोळ्या घालू शकत नाहीत. यावरून विज आणि संगीता कालिया यांच्यात वाद झाला, त्यानंतर बैठक अर्धवटच थांबवावी लागली. विज यांनी संगीता कालिया यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. कालिया बाहेर न गेल्याने विज यांना स्वतः बैठक सोडावी लागली. या घटनेनंतर कालिया यांची बदली झाली. मंत्री विज यांच्याशी झालेल्या वादामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.
‘उडान’ सीरियलमधून घेतली प्रेरणा
IPS संगीता कालिया यांचे वडील धरमपाल फतेहाबाद पोलिसात सुतरकाम करत होते. ते 2010 मध्ये तेथून निवृत्त झाले. संगीता यांनी त्यांचे शिक्षण भिवानी येथून केले आणि 2005 मध्ये UPSCची पहिली परीक्षा दिली, परंतु त्या 2009 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. संगीता यांच्या (IPS Success Story) म्हणण्यानुसार, उडान ही मालिका पाहिल्यानंतर त्यांना पोलिसात अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे पती विवेक कालिया हे देखील हरियाणात एचसीएस आहेत.
IPS होण्यासाठी 6 नोकऱ्या सोडल्या
भिवानी जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात संगीता यांचा जन्म झाला. त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले. संगीता या एक दोन नव्हे तर सहा नोकरीच्या ऑफर सोडून पोलीस खात्यात आल्या होत्या. त्या सांगतात; ”पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करताना, मी शपथ घेतली (IPS Success Story) होती की मी माझ्या आचरणातून गणवेशावर कोणताही डाग पडू देणार नाही आणि प्रत्येक पोस्टिंगवर मी तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कधीही खोटेपणाचा अवलंब केला नाही आणि मी कधीही खोटेपणा करणार नाही.” संगीता यांची एसपी म्हणून पहिली पोस्टिंग त्याच पोलीस खात्यात झाली जिथे त्यांचे वडील सुतार होते.
तिसऱ्या प्रयत्नात मिळालं IPS पद
संगीता यांनी 2005 साली सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर दिला होता, पण त्यामध्ये त्यांना अपयश आले. रेल्वेत नोकरी मिळाली पण त्या रुजू झाल्या नाहीत. नंतर 2009 च्या बॅचमध्ये तिसर्या प्रयत्नात (IPS Success Story) त्यांची IPS पदावर निवड झाली. संगीता यांना साहित्य आणि संगीतातही रस आहे. त्या दिवसाचे 15 तास काम करतात. फतेहाबादमध्ये महिला पोलिस स्टेशनची इमारत बांधण्याचे श्रेयही संगीता कालिया यांना जाते. याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली फतेहाबाद पोलिसांनी अनेक अंध खुनाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
संगीता या मूळच्या भिवानी येथील
IPSIPS संगीता कालिया या मूळच्या भिवानी जिल्ह्यातील आहेत. फतेहाबाद (IPS Success Story) नंतर त्यांची रेवाडी येथे बदली झाली. त्यानंतर त्या काही काळ भिवानी आणि पानिपतमध्ये राहिल्या. आता त्या रेल्वेत एसपी म्हणून कार्यरत आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com