करिअरनामा ऑनलाईन । पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण (IPS Success Story) होणे खूप अवघड आहे. तरीही असे अनेक उमेदवार आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाले आहेत. यापैकीच एक आहेत IPS अधिकारी प्रभाकर चौधरी…ते असे आयपीएस अधिकारी आहेत, जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा
IPS प्रभाकर चौधरी हे उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील रहिवासी आहेत. अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc पूर्ण केल्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. 2010 मध्ये ते पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले आणि पहिल्याच प्रयत्नात ते पासही झाले. नोएडामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी कानपूर, बनारस, बलिया, बुलंदशहर आणि मेरठच्या पोलीस दलातही काम केले.
बेधडक IPS अधिकारी (IPS Success Story)
आयपीएस प्रभाकर चौधरी हे पोलिस दलातील नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी ओळखले जातात. याशिवाय त्यांच्या बदल्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांची 13 वर्षांत 21 वेळा बदली झाली आहे. प्रभाकर चौधरी हे बेधडक आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.
‘या’ कारणांमुळे नेहमी राहतात चर्चेत
IPS प्रभाकर चौधरी यांची 2016 मध्ये कानपूर देहाटचे SP म्हणून नियुक्ती झाली होती. एसपी झाल्यानंतर ते सरकारी वाहनांचा वापर करण्याऐवजी स्टेट रोड बस आणि टेम्पोने कार्यालयात जात होते. याशिवाय रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी त्यांनी स्वत: वाहन चालवले आहे. 2017 मध्ये मेरठमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी माफियांवर कारवाई केली आणि चोरीच्या अनेक घटनांचा पर्दाफाश केला.
दुसरी घटना म्हणजे, NSG कमांडोना प्रशिक्षण दिलेले प्रभाकर चौधरी आपल्या फिटनेसची पुरेपूर काळजी घेतात. सपा सरकारने ऑक्टोबर 2016 मध्ये प्रभाकर चौधरी यांना (IPS Success Story) कानपूर देहाटचे SP बनवले तेव्हा ते जड बॅग घेऊन विद्यार्थ्यासारखे सामील झाले. तक्रारदार म्हणून त्यांनी पोलीस ठाणे गाठून सायकल चोरीचा एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि एकही पोलीस त्यांना ओळखू शकला नाही.
जिद्द आणि मेहनतीने IPSची खुर्ची मिळवली
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले प्रभाकर चौधरी आज आपल्या कष्टाने ज्या स्थानावर पोहोचले आहेत ते गाठणे सोपे नाही. पाच बहिणींमध्ये प्रेम आणि आपुलकीने वाढलेल्या प्रभाकर चौधरीबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या बहिणींच्या प्रेमामुळेच त्यांना आयपीएस पदापर्यंत पोहोचवले आहे.
वडील शेतकरी, आई गृहिणी, अत्यंत साधे कुटुंब
प्रभाकर चौधरी हे एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नव्हते. प्रभाकरचं कामाचं आयुष्य जेवढं धमाल आहे, तितकंच ते त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितक्याच साधेपणानं जगतात. IPS प्रभाकर चौधरी हे आंबेडकरनगर जिल्ह्यातील हंसवार पोलीस स्टेशन हद्दीतील मेधी सुलेम गावातील पूर्वा महमूद पुरचे रहिवासी आहेत. पारसनाथ चौधरी असे त्यांच्या वडिलांचे नाव असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई आणि काका राम नरेश चौधरी यांचा समावेश आहे. ते शेतीची कामेही करतात.
बरेली येथे झाली बदली
आयपीएस प्रभाकर चौधरी यांची या वर्षी मार्चमध्ये बरेली येथे (IPS Success Story) बदली झाली होती. त्यांनी 14 मार्च रोजी बरेली येथे पदभार स्वीकारला. बरेलीतील कावड यात्रेदरम्यान कंवरियांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी आयपीएस प्रभाकर चौधरी यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता त्यांना 32 व्या पीएसी लखनऊमध्ये पाठवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com