करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी (IPS Success Story) या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबत आईला शेतात मदत करायला सुरुवात केली.
मिळाली ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिप
मुरादाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इल्मा अफरोजने सेंट स्टीफन्स, दिल्ली येथे प्रवेश घेतला. तेथून तिने तत्त्वज्ञानात पदवीचे शिक्षण घेतले. सेंट स्टीफनमध्ये घालवलेल्या वर्षांना ती तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ मानते, जिथे तिला खूप काही शिकायला मिळाले. इल्माने (IPS Success Story) घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे तिला ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
प्रसंगी शिकवणी घेतल्या; मुलांनाही सांभाळले (IPS Success Story)
इल्माकडे त्यावेळी परदेशात जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते. यासाठी तिने गावातील चौधरी दादांची मदत घेतली. तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली. पण इतर खर्च पूर्ण करण्यासाठी तिने शाळेतील मुलांची शिकवणी घेण्याचे आणि मुलांना संभाळण्याचे काम हातात घेतले. दरम्यान, ती आता परदेशात राहणार असून भारतात परतणार नसल्याचे तिच्या गावकऱ्यांनी तिच्या आईला सांगायला सुरुवात केली होती.
‘शिक्षणावर आईचा आणि देशाचा हक्क’
पोस्ट ग्रॅज्युएशननंतर, इल्मा अफरोज एका स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. तिथे तिला फायनान्शिअल इस्टेट कंपनीत उत्तम नोकरीची ऑफर मिळाली. पण आपल्या शिक्षणावर आईचा आणि देशाचा हक्क आहे, असे तिला सतत वाटायाचे (IPS Success Story) म्हणूनच तिने भारतात परतून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये, इल्माने नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून 217 वा क्रमांक मिळविला. तेव्हा ती 26 वर्षांची होती. सध्या ती शिमल्यात SP SDRF म्हणून तैनात आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com