करिअरनामा ऑनलाईन । तीच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण (IPS Success Story) परिस्थिती समोर हार न मानता या तरुणीने देशातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा पास केली आणि पहिल्या प्रयत्नातच IPS पदावर मोहोर उमटवली आहे. दिव्या तन्वर असं या IPS तरुणीचे नाव आहे.
कोचिंग क्लास शिवाय केला अभ्यास
दिव्या तन्वर यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी घरी राहून UPSC च्या परीक्षेची तयारी केली आहे. अभ्यास करताना त्यांनी कोणताही क्लास न लावता परीक्षेची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परिक्षेत यश मिळवत संपूर्ण भारतातून 438 रँक प्राप्त केली आहे.
वडिलांच्या निधनानंतर आईने सावरलं (IPS Success Story)
2011 मध्ये दिव्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांची आई बबिता यांनी गावात शिलाई आणि मजुरीचे काम करून मुलीचे शिक्षण पूर्ण केले. काही जण घरची आर्थिक (IPS Success Story) परिस्थिती त्यांच्या यशाच्या मार्गातील अडसर मानतात. जे असे मानतात ते हारतात आणि कष्ट करणे सोडून देतात. तर काही जण हार न मानता यशाला गवसणी घालतात. असंच घडलंय दिव्या यांच्या बाबतीत घडलं आहे.
अवघ्या 21 व्या वर्षी बनली अधिकारी
दिव्या तन्वर यांचा जन्म 9 मार्च 2000 रोजी झाला. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS होण्याचा बहुमान मिळवला आहे. दिव्या तंवर या हरियाणातील महेंद्रगडमधील निंबी या गावच्या रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव भरत सिंह आणि आईचे नाव बबिता (IPS Success Story) कंवर आहे. IPS अधिकारी दिव्या तन्वर यांनी नवोदय विद्यालय महेंद्रगड येथून शिक्षण घेतले आहे. B.Sc. केल्यानंतर त्यांनी UPSC कडे मोर्चा वळवला. दिव्याने घरातील एका छोट्या खोलीत दररोज दहा तास अभ्यास करून परीक्षेची तयारी केली.
तरुणाईला मोलाचा सल्ला
“IPS दिव्या तन्वर सांगतात की, मेहनतीला पर्याय नाही. एक ध्येय बनवा आणि त्यात सहभागी व्हा. जमेल तितके कष्ट करा. हार मानू नका नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवला (IPS Success Story) तर यश मिळणे निश्चित आहे;” असा मोलाचा सल्ला दिव्या युवा पिढीला देतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com