तलाठी ते IPS : कपडे घ्यायला पैसे नव्हते, पण जिद्दीने 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा आॅनलाईन : एक निडर आयपीएस ऑफिसर म्हणून प्रेमसुख डेलू यांची ओळख आहे. त्यांना पाहून गुन्हेगारांचा थरकाप उडतो. ‘डेलू ने बोला तो फायनल’ अशी टॅगलाईन आता अमरेली जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यामधील नोखा तहसील क्षेत्रातील रासीसर हे डेलू यांचे मुळगाव. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1988 साली झाला.

प्रेमसुख यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं. कपडे खरेदी करण्या इतकेही पैसे त्यांच्याकडे नसायचे. त्यामुळे आठवीपर्यंत त्यांना फूल पॅन्ट वापरणं माहिती नव्हतं. प्रेमसुख यांचे आई-वडील अशिक्षित होते. पण, मुलांनी शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. IPS डेलू सांगतात की त्यांनी IPS होण्यापूर्वी ज्या नोकऱ्या केल्या त्यामधून त्यांनी चांगली शिकवण घेतलेली आहे.

प्रेमसुख डेलू यांच्या हुशारीचा अंदाज या गोष्टीवरून लावता येऊ शकतो की त्यांनी 12 वेळा सरकारी नोकरी मिळवलेली आहे. अनेक सरकारी परीक्षांमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत. ते गुजरात कॅडरचे IPS ऑफिसर आहेत. सध्या ते अहमदाबादमध्ये अमरेली जिल्ह्यात DSP पदावर कार्यरत आहेत. प्रेमसुख डेलू यांना 2010 मध्ये क्लार्क म्हणून पहिली सरकारी नोकरी लागली. यानंतर देखील त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला. ग्रामसेवक परीक्षेमध्ये त्यांनी राजस्थानमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. तलाठी म्हणून काम करण्याआधीच त्यांनी राजस्थानमध्ये असिस्टंट जेलर जॉईन केलं. त्याआधी राजस्थान पोलिसांमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी ही त्यांची निवड झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये RSS म्हणजेच राजस्थान प्रशासकीय सेवेमध्ये देखील त्यांची निवड झाली होती.

यानंतर त्यांनी रेवेन्यू सर्विस जॉईन केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेचा (UPSC Exam) अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये त्यांनी संपूर्ण भारतातून 117 वा रँक मिळवत ते IPS ऑफिसर बनले. त्यांची पहिली पोस्टिंग साबरकांठा जिल्ह्यामध्ये ASP पदावर झाली. आज ते एक जिगरबाज ऑफिर म्हणून प्रसिद्ध आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेमसुख डेलू यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com