करीयरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा आणि अपयश या समांतर असणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये अनेक मुलांना अपयश येते. स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी २-३ अपयश आले कि लगेच दुसरी वाट शोधतात. स्पर्धा परीक्षेची कठीण पातळी अधिक असली तरीही चिकाटीनं अभ्यास करण्याची वृत्ती असल्यास यात हमखास यश येते. स्पर्धा परीक्षेत तब्बल ३५ वेळा अपयश आले तरीही न खचता शेवटी IPS होणाऱ्या विजय वर्धन यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील विजय वर्धन यांनी ३० सरकारी जागांसाठी परीक्षा दिल्या. पण त्यात त्यांना अपयश आले. तरीही यातून खचून न जात विजय यांनी UPSC ची तयारी सुरु केली. परंतु ५ वेळा UPSC मध्येही अपयश आले. तरी विजय वर्धन यांनी हार न मानता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली. अखेर ३६ व्या प्रयत्नांत ते यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले. आणि तरुणांसाठी एक प्रकारे दिशार्शक झाले आहेत.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले विजय वर्धन यांनी UPSC देण्याचे डिग्रीचे शिक्षण झाल्यावर ठरवले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणामध्येच झाले. यानंतर हिसार इथून त्यांनी 2013 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. विजय यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी केली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दिल्ली गाठली व तेथूनच त्यांनी UPSC परीक्षेचे कोचिंग घेतले. इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा UPSC परीक्षेत पास होणं हे खूप कठीण मानलं जातं. त्यामुळे सरकारी नोकरीत इतर ठिकाणी परीक्षा देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. यूपीएससी व्यतिरिक्त ए आणि बी दर्जाच्या हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल असे अनेक 30 वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करुन परीक्षा दिल्या होत्या. यापैकी एकही परीक्षेत त्यांची निवड झाली नाही. पण त्यांनी निराश न होता पुन्हा एकदा जोरदार तयारीला सुरुवात केली. आणि शेवटी UPSC मध्ये पास होऊन अधिकारी झालेच.
इतर वेगवेगळ्या परीक्षा जरी ते देत असले तरी, विजय यांचे मुख्य लक्ष्य यूपीएससी परीक्षेवर होते, त्याच अनुषंगाने त्यांनी 2014 पासून यूपीएससी परीक्षा देणे सुरू केले. 2014 आणि 2015 मध्ये विजय फक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुख्य परीक्षेत नापास झाले. तिसऱ्यांदा विजयने आपल्या तयारीचा मार्ग बदलला. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही विजयचा हेतू डगमगला नाही आणि 2017 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी मुलाखतीत पोहोचले. वारंवार अपयशी ठरले तरी विजय यांचा दृढ निश्चय आणि त्याहीपेक्षा धैर्य वाखाणण्याजोगे होते. विजय वर्धन यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर विश्वस ठेवून तयारी करणे गरजेचे आहे. त्यांची हि कहाणी विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरेल अशी अशा करूया.