करिअरनामा ऑनलाईन। तुम्हाला नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीला (Interview Tips) जाण्याची भीती वाटते का? तुम्ही मुलाखती दरम्यान सर्वकाही विसरुन जाता का? इंटरव्ह्यूला जाताना तणाव येतो, घाम येतो, असं होतं का? असे होत असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मुलाखत हा तुमच्या करिअर मधील सर्वात मोठा टप्पा आहे. ही मुलाखत मी कशी उत्तीर्ण होईन? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची? अशा अनेक शंका उमेदवारांच्या मनात येत असतात.
दरम्यान या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत.
1. आत्मविश्वास बाळगा
आत्मविश्वास ही कोणत्याही मुलाखतीची सर्वात मोठी आवश्यक बाब असते. तुमच्या देहबोलीत (चालणे, बोलणे इ.) तुमचा आत्मविश्वास प्रतिबिंबित झाला पाहिजे. तुमचा प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि स्वारस्य दर्शविण्यासाठी मुलाखतीत समोरच्यांच्या डोळ्यांशी संपर्क ठेवा. डोळ्यांशी संपर्कात राहणे म्हणजे टक लावून पाहणे असा नाही.
2. पूर्व तयारी गरजेची (Interview Tips)
चांगल्या पूर्व तयारीतून चांगला आत्मविश्वास येतो. त्यामुळे मुलाखतीची तयारी पुरेशा संशोधनावर आधारित असावी. तुम्ही गेल्या एक-दोन वर्षात केलेल्या कामाबद्दल तुम्हाला सर्व काही चांगले माहित असले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेशासाठी मुलाखत देत (Interview Tips) असाल तर तुम्हाला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे त्याविषयी जास्तीत जास्त माहिती हवी. नोकरी का करायची आहे यासारख्या प्रश्नांसाठी आधीच तयार असले पाहिजे.
3. मुलाखत पॅनेलला अभिवादन करा
सौजन्य हा सभ्यता आणि योग्य वर्तनाचा नियम आहे. सौजन्य हा आदर दाखवण्याचा मार्ग आहे. शिष्टाचार राखलात तर वेगवेगळी परिस्थिती हाताळण्यात तुम्ही किती सक्षम आहात हे मुलाखतकर्त्याला दिसते. हे कृतीतून दर्शविण्यासाठी मुलाखतीच्या खोलीत प्रवेश करताच सुप्रभात किंवा नमस्कार वगैरे बोलून संपूर्ण मुलाखत पॅनेलला योग्यरित्या अभिवादन करा. मुलाखतीदरम्यान एखादा प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे माफी मागा.
4. बॉडी लॅंग्वेज
‘पहिली छाप ही शेवटची छाप’; असे म्हणतात. मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वच्छआंघोळ करा, पादत्राणांसह स्वच्छ धुतलेले/इस्त्री केलेले औपचारिक कपडे घाला. या (Interview Tips) गोष्टीमुळे मुलाखत पॅनेलवर तुमचे इम्प्रेशन चांगले पडेल.
सुगंधासाठी सौम्य डीओ वापरा आणि परफ्यूमचे दुकान बनू नका. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी तुमच्या खिशात हात रुमाल ठेवा.
तुमच्या देहबोलीतून समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल न सांगताही सर्वकाही कळत असते. त्यामुळे तुमच्या देहबोलीसंदर्भातील प्रत्येक लहानात लहान गोष्टीकडे लक्ष ठेवा. मुलाखत देताना अंगाची जास्त हालचाल करु नका. तुमच्याकडे फाईल असेल तर ती तुमच्या मांडीवर ठेवा. खुर्चीवर सरळ बसणे आत्मविश्वास आणि विश्वासार्हता दर्शवते. चेहऱ्यावर हलके हसू ठेवा.
5. मुलाखतकाराला प्रभावित करा
प्रत्येक मुलाखतीत अनेक प्रश्न बहुदा सारखेच असतात. तुम्ही सध्या काय करता? आवडता छंद? वगैरे अशा प्रश्नांची तीच तीच उत्तरे न देता वेगळ्या पद्धतीने उत्तरे देऊन (Interview Tips) मुलाखतकाराला प्रभावित करा. येथे प्रामाणिकपणा सर्वोत्तम ठरतो. स्वयंपाक, योगा, वाचन, संगीत जे काही करत असाल ते प्रामाणिकपणे सांगा.
याशिवाय मुलाखतीला जाण्यापूर्वी पुरेसा बोलण्याचा सराव करा. सकारात्मक राहा, औपचारिक भाषेचा वापर करा. असे केलात तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com