करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI CA Result 2024) ने सीए मे इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. सीए फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्राने 500 गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे, तर दिल्लीच्या वर्षा अरोराने 480 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईचा किरण राजेंद्र सिंग आणि सलीम अन्सारी तिसऱ्या स्थानावर आहेत. तसेच भिवंडी येथील कुशाग्र रॉय हा सीए इंटरमिजिएट परीक्षेत अव्वल ठरला आहे. कुशाग्रला सीए इंटरमिजिएट परीक्षेत ५२६ गुण मिळाले आहेत. तिसऱ्या स्थानावर दिल्लीचा मनितसिंग भाटिया आणि मुंबईचा हिरेश आहे. सीए इंटरमिजिएट परीक्षेत त्याने 519 गुण मिळवले आहेत.
येथे तपासा निकाल
The Institute of Chartered Accounts of India (ICAI) ने घेतलेल्या परीक्षांचे निकाल या वेबसाइट्सवर पाहता येतील.
1. icai.nic.in
2. icaiexam.icai.org
3. caresults.icai.org
74 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा (ICAI CA Result 2024)
सीए फायनल परीक्षा 74,887 उमेदवारांनी दिली होती, त्यापैकी केवळ 20,479 उमेदवार उत्तीर्ण होऊ शकले. त्याचप्रमाणे गट 2 च्या परीक्षेत एकूण 58,891 उमेदवार बसले होते त्यात केवळ 21,408 उमेदवार उत्तीर्ण होऊ शकले.
एक लाख विद्यार्थ्यांनी दिली सीए इंटरमिजिएट परीक्षा
सीए मे इंटरमीडिएट परीक्षा 2024 मध्ये गट 1 साठी एकूण 1 लाख 17 हजार 764 उमेदवार बसले होते, त्यापैकी केवळ 31,978 उमेदवार उत्तीर्ण झाले. गट 2 च्या परीक्षेत (ICAI CA Result 2024) एकूण 71 हजार 145 उमेदवार बसले होते, त्यापैकी 13,008 उमेदवार पास झाले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com