Infosys Hiring 2025: आनदांची बातमी! इन्फोसिस द्वारे नवीन 20,000 कर्मचाऱ्यांची भरती होणार.

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस कंपनीने यावर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Infosys Hiring 2025) IT मध्ये नोकरी करू पाहणाऱ्यांसाठी ही एक आनदांची बातमी ठरणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्याचबरोबर कंपनी यंदा काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते महत्वाचे निर्णय कुठले असणार आहेत ? या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

नवीन कर्मचाऱ्यांची भरती (Infosys Hiring 2025) –

गेल्या अर्थिक वर्षात कंपनीनं 11,900 फ्रेशर्सना नोकरीच्या संधी दिल्या होत्या. पण त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत अर्थात 2023 च्या तुलनेत यात 76 टक्के घट झाली होती. कारण 2023-24 या अर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल 50,000 फ्रेशर्सची भरती केली होती. पण यावर्षी कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 5,591 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे, ज्यामुळे एकूण कामकाजी संख्येची वाढ 3,23,379 झाली आहे.

(Infosys Hiring 2025) इन्फोसिसने घोषित केले आहे की चालू आर्थिक वर्षात आणखी 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण गेल्या काही वर्षात इन्फोसिसने फ्रेशर्सच्या जॉइनिंगच्या तारखांमध्ये विलंब केल्यामुळे कंपनीला टीकेला सामोरे जावे लागले आहे. 2022 मध्ये ज्या तरुण अभियंत्यांना सिस्टम इंजिनीअर म्हणून नियुक्तीची ऑफर देण्यात आली होती, त्यांना कामावर रुजू होण्यासाठी दोन वर्षांहून अधिक प्रतीक्षा करावी लागली. यामुळे आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सच्या जॉइनिंग संदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. काही संघटनांनी कंपनीला इशारा दिला होता की जॉइनिंगची तारीख पुन्हा ढकलल्यास निदर्शन केली जातील.

इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका (CFO jayesh sanghrajka) यांनी म्हटलं की आम्ही चालू आर्थिक वर्षात फ्रेशर्सच्या भरतीसाठी मनुष्यबळाचा आढावा घेत आहोत. या आर्थिक वर्षात 15 हजारांपेक्षा जास्त फ्रेशर्सना नोकरी दिली जाईल, असं ते म्हणाले. तर येत्या आर्थिक वर्षात ती संख्या 20 हजारांपर्यंत असेल असं ते म्हणाले. त्याचबरोबर इन्फोसिनं त्यांना अपेक्षित असलेल्या फायद्यापेक्षा अधिक फायदा तिसऱ्या तिमाहीत मिळवला आहे. कंपनीचा यूरोप आणि अमेरिकेतील व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे नफा मिळवून देत आहे.

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा –

इन्फोसिस या भारतातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनीने नव्या भरतीची घोषणा करून कर्मचाऱ्यांना (Infosys Hiring 2025) मोठा दिलासा दिला आहे. इन्फोसिसच्या या कामगिरीने कंपनीच्या नफ्यात वाढ दर्शवली आहे, कर्मचाऱ्यांची भरती योजना सॉफ्टवेअर क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडसाठी उत्तम ठरणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत.

नोकरीविषयक नवनवीन संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – IOCL Apprentice Recruitment 2025: IOCL अंतर्गत मोठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती