करिअरनामा ऑनलाईन । शहर असो किंवा ग्रामीण (Indian Navy Success Story) भागातील एखादं गांव… तिथली अनेक मुलं हुशार होतकरू असतात. अनेकांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. ज्यांना शिक्षण घ्यायचं असतं त्यांना अनेकदा अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी असे असतात जे कशाचीही तमा न बाळगता ठरवलेले ध्येय गाठतात. महाराष्ट्रातील अशाच एका जिद्दी मुलीची प्रेरणादायी कहाणी आज आपण पाहणार आहोत.
वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील
जळगावच्या बोदवड तालुक्यातील चिखली येथील एका गाव खेड्यातील रिक्षा चालकाच्या मुलीने किमयाच केली आहे. तिने चक्क नेव्ही अधिकारी होण्यापर्यंत मजल (Indian Navy Success Story) मारली आहे. यामुळे गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या मुलींचं सर्वत्र कौतुक होत आहे. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील असं त्या मुलीचं नाव असून तीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठत थेट नेव्ही अधिकाऱ्यापर्यंत मजल मारली आहे.
वडील रिक्षा चालक (Indian Navy Success Story)
वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थिनीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठलं आहे. तिने थेट नेव्हीच्या अधिकारी पदापर्यंत मजल मारल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीचे वडील ज्ञानेश्वर पाटील हे घर खर्च भागवण्यासाठी (Indian Navy Success Story) रिक्षा चालवतात. मुलीच्या शिक्षणात आर्थिक अडचणी येवू नयेत यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांनी मुलीला लागेल ते अभ्यासाचे साहित्य वेळोवेळी पुरवले.
परीक्षेला जाताना पैसे जमवण्यासाठी आई-वडिलांनी ‘हे’ केलं
वैष्णवीचा हैदराबाद येथे नेव्हीच्या परिक्षेचा पेपर होता. त्यावेळी घरात एक रुपया सुध्दा नव्हता. शेवटी वैष्णवीच्या आई-वडिलांनी एलआयसी मनी बॅक पॉलिसीचे पैसे काढले. त्यांनी तात्काळ ते पैसे मुलीला विमानाच्या तिकिटासाठी दिले. अखेर वैष्णवीने नेव्हीची परीक्षा दिली. अत्यंत (Indian Navy Success Story) बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करीत वैष्णवीने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. सध्या ती इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी पद भूषवत आहे. वैष्णवीला घरच्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती इथपर्यंत पोहचली. तिच्यामधील अभ्यासाची तळमळ पाहून घरच्यांनी देखील तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com