करिअरनामा ऑनलाईन। भारतीय आर्मीमध्ये भरती होण्यापूर्वी तरुणांना अनेक चाचण्यांमधून (Indian Army) जावे लागते. आर्मीत भरती होणारा तरुण केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून चालत नाही, तर भरतीचे काही निकष हे वेगळे असतात आणि ज्याची पूर्तता झाली नाही तर तरुणांना आर्मीत भरती होण्यापासून नाकारले जाऊ शकते.
देशप्रेमाचा जोश असलेला प्रत्येक तरुण देशसेवेसाठी आर्मीत भरती होण्याचं स्वप्न पाहत असतो. देशाचं संरक्षण आणि सुरक्षेमध्ये आपलं योगदान देण्यासाठी तो प्रत्येक परीक्षेमधून तावून सुलाखून बाहेर पडण्यास तयार असतो. मात्र लष्करात भरती होण्याचं सर्वांचंच स्वप्न सत्यात उतरतं असं नाही. अनेक तरुण आर्मी प्रशासनाकडून भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरतात.
काय आहे कारण? (Indian Army)
आर्मी भरतीचे काही निकष हे वेगळे असतात. ज्यांची पूर्तता झाली नाही तर तरुणांना लष्करात प्रवेश मिळत नाही. असाच एक निकष आहे, तरुणांचे सपाट पाय असणे. ऐकून आश्चर्य वाटले असेल ना? पण हे खरं आहे. आर्मीत भरती होणाऱ्या तरुणाचे पाय सपाट असतील तर त्या उमेदवाराला आर्मीत भरती होण्यापासून रोखलं जाऊ शकतं.
सपाट पाय असलेल्या तरुणांची आर्मीमध्ये भरती होत नाही. सपाट पाय असलेल्या तरुणांना भरतीच्या पुढच्या प्रक्रियेत जाण्यापासून रोखले जाते. एवढंच नाही तर त्यांना ट्रेनिंग पूर्ण करण्याचीही परवानगी दिली जात नाही. आता तुम्ही विचार कराल की, असं का होतं, तर त्यामागे एक खास कारण आहे. हे असं कारण आहे ज्यामुळे लष्करात भरती होण्याची इच्छा असलेल्या तरुणांचं स्वप्न क्षाणार्धात तुटतं. मात्र दुःखद बाब म्हणजे या समस्येवर कुणाकडेच उपाय नसतो. ते कारण म्हणजे सपाट पाय असणं.
सपाट पाय असणारे ठरतात अनफिट
या शारीरिक कमतरतेला ‘फ्लॅट फूट’ असंही म्हणतात. कारण असा परिस्थितीत पायाचे तळवे हे पूर्णपणे सपाट असतात. त्यामुळे असे पाय असलेले लोक पायावर अधिकाधिक भार देण्यास सक्षम नसतात. तसेच सपाट पाय असणाऱ्या तरुणांना वेगाने धावताही येत नाही. आर्मीमध्ये सपाट पाय असलेल्या लोकांना अनफिट घोषित केले जाते. कारण ते अधिक वेळ उभे (Indian Army) राहू शकत नाहीत. तसेच वेगाने धावूही शकत नाहीत. त्याशिवाय त्यांच्या शरीराच्या विविध भागामध्ये वेदना होतात. आर्मीतील जवानांकडून अपेक्षित असलेली चपळता अशा तरुणांकडे नसते. त्यामुळे अशा तरुणाला आर्मीत भरतीपासून नाकारले जाते. युद्धभूमीवरील प्रत्येक जवान चपळ आणि तितकाच मजबूत असणं गरजेचं असतं; त्यामुळं एखाद्या तरुणाचे पाय सपाट असतील तर त्याला आर्मी भरतीपासून रोखलं जाऊ शकतं.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com