करिअरनामा ऑनलाईन । जगातील अनेक देशांच्या सैन्यात (Indian Army) ट्रान्सजेंडर्सची भरती झाली आहे. आता भारतातही याविषयी निर्णय घेण्यासाठी मोठे पाऊल उचले जावू शकते. देशात एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे जो यासंबंधी विचार करेल. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह जगातील 19 देशांच्या सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती केली जात आहे. तर नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे जिथे ट्रान्सजेंडर्सच्या भरतीस 1974 पासून सुरवात झाली होती.
ट्रान्सजेंडर्सच्या सैन्यातील भरतीबाबत निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाने एक खास एक गट तयार केला असून तो संरक्षण क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सना कसं तैनात करता येईल याचा अभ्यास करेल. हा उपक्रम यशस्वी झाल्यास देशात समानता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल.
आत्तापर्यंत भारतीय लष्कराच्या कोणत्याही भागात ट्रान्सजेंडर्सना प्रवेश मिळालेला नाही. मात्र, याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.एका अहवालानुसार ट्रान्सजेंडर्सना सैन्यात प्रवेश मिळाल्यास त्यांना प्रशिक्षणापासून निवडीपर्यंत कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
सरकारने या दिशेने पावले टाकली तर अनेक आव्हाने उभी राहतील. असे झाल्यास त्याकडे रोजगाराची संधी म्हणून पाहता येणार नाही, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. येथे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. जसे- त्यांच्या राहण्यासाठी घर, शौचालय आणि कामाचा नमुना.
ट्रान्सजेंडर्सची नेदरलँडमध्ये झाली पहिली भरती
1974 मध्ये पहिल्यांदाच सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती (Indian Army) सुरू झाली. असे करणारा तो पहिला देश ठरला. यानंतर जगातील अनेक देशांनी ट्रान्सजेंडर्सना सैन्यात प्रवेश दिला. नेदरलँडनंतर 1976 मध्ये स्वीडन, 1878 मध्ये डेन्मार्क, 1979 मध्ये नॉर्वे आणि त्यानंतर कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अशा भरती होवू लागल्या.
भारतात 2015 मध्ये, तामिळनाडूने देशातील पहिल्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याच वेळी, छत्तीसगड हे पोलीस दलात ट्रान्सजेंडर समुदायाची सक्रियपणे भरती करणारे पहिले राज्य ठरले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com