करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Indian Army Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या गटात तब्बल 1 लाख 10 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. 18 ते 23 वयोगटातील तरुणांना या संधीचा लाभ होणार आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता सज्ज व्हायची वेळ आली आहे.
संरक्षण दलातील नाेकऱ्या व तयारी याबाबत विदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या अध्यक्षा डाॅ. राजेश्वरी वानखडे यांनी संरक्षण दलाच्या वेबसाइटच्या आधारे मेगाभरतीची माहिती दिली. या माध्यमातून ‘एसएससी जीडी’ या पदाच्या ८४,८६६ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासह सीआरपीएफ काॅन्स्टेबल पदाच्या ३० हजार जागांची भरती होत आहे. २४ नाेव्हेंबरपासून या दाेन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असून, २८ डिसेंबर अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र विद्यार्थी या दोन्ही (Indian Army Recruitment 2023) गटांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या पदांच्या परीक्षा होणार आहेत. या दोन्ही पदांसाठी मुला- मुलींची उंची व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयाची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. निवड झालेल्या उमेदवाराला 40 ते 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com