नवी दिल्ली । आता भारतातील तरुणांना भारतीय लष्करात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या खास योजनेची आखणी करण्यात आली आहे. अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांकरता सदर इंटर्नशिप करता येणार आहे. भारतीय आर्मीने अशाप्रकारचा एक प्रस्ताव सध्या सरकारसमोर ठेवला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. Tour of Duty
देशात सध्या प्रचंड बेरोजगारी आहे. या पार्श्वभूमीवर तरुण वर्गाला एक रोजगाराची संधी मिळावी तसेच त्याचा देशसेवेला फायदा व्हावा या उद्देशाने हि योजना आखण्यात आली आहे. ज्या युवकांना सैन्यदलामध्ये कायमस्वरुपी करिअर करायचे नाही. पण सैन्यामधला थरार अनुभवायचा आहे. अशांसाठी तीन वर्षांकरता ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. Tour of Duty
Army mulling proposal to give three-year 'Tour of Duty' to common citizens in Force
Read @ANI Story | https://t.co/BxIhb1zevN pic.twitter.com/ANl9Fsx8yt
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2020
इंटर्नशिप कार्यक्रमातंर्गत सैन्य दलात प्रवेशाच्या निकषामध्ये कुठलीही सवलत मिळणार नाही. ‘या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे’ अशी माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली. हा प्रस्ताव स्वीकारला तरी ‘टूर ऑफ ड्युटी’ प्रत्येकासाठी बंधनकारक असणार नाही. तीन वर्षांच्या इंटर्नशिपसाठी सैन्य दलात रुजू झाल्यानंतर मिळणारे वेतन करमुक्त असू शकते तसेच पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये प्राधान्य सुद्धा मिळू शकते. Tour of Duty
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com