करिअरनामा ऑनलाईन | अकरावी प्रवेशातून वंचित राहिलेल्या मुलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशावीना राहिले आहेत, या मुलांसाठी राज्यातील सहा महानगर क्षेत्रात इयत्ता अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन फेरींचे आयोजन केले गेले आहे. सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीचे प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्विस (FCFS) म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीचा समावेश आहे.
प्रवेशकरिता जे विद्यार्थी व्हेरिफाईड आहेत आणि एफसीएफएस राऊंड साठी पात्र आहेत, डिसेंबर 2020 मध्ये जे विद्यार्थी दहावी परीक्षा पास झाले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये एटी-केटी मिळाली होती असे सर्व विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र असतील. सन 2020-21 या शेक्षणीक वर्षासाठी अकरावी प्रवेशाकरता 13 फेब्रुवारी 2021 ही अंतिम दिनांक असेल. यानंतर अकरावी प्रवेश होणार नाहीत. त्यामुळे अकरावीप्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 13 फेब्रुवारी 2019 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा.
सध्याच्या अतिरिक्त FCFS फेरी अंतर्गत 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. व 13 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. एखाद्या अकरावी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर, पहिल्या ठिकाणी घेतलेला प्रवेश तो रद्द करू शकतो. पण ज्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजमध्ये जागा असल्याची खात्री करूनच त्याने पहिला प्रवेश रद्द करावा. अन्यथा त्याला परत प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.