ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्जामध्ये बदल करता येणार; दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडियाकडून मे 2024 च्या CA परीक्षेसाठीची दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आधीच अर्ज केला आहे ते उमेदवार 27 ते 29 मार्च या कालावधीत icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम यामध्ये बदल करू शकतात. मे 2024 च्या CA परीक्षांसाठी आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी, परीक्षा शहर, गट आणि माध्यम बदलण्यासाठी ऑनलाइन विनंती पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ICAI कडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थी या वेळेत करु शकतात बदल (ICAI CA Exam 2024)
नोटीसमध्ये म्हटले आहे की, सीए इंटरमिजिएट आणि फायनल मे परीक्षा उमेदवार ज्यांना परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम बदलायचे आहेत ते उमेदवार येत्या 27 मार्च रोजी सकाळी 10 ते 29 मार्च रात्री 11:59 वाजेपर्यंत बदल करू शकतात.
लोकसभानिवडणुकांच्या घोषणेनंतर ICAI ने CA फायनल आणि (ICAI CA Exam 2024) इंटरमीडिएट मे 2024 च्या डेट शीटमध्ये सुधारणा केली होती. सुधारित वेळापत्रकानुसार, इंटरमिजिएट ग्रुप 1 च्या परीक्षा 7 मे ऐवजी 3, 5 आणि 9 मे रोजी आणि ग्रुप 2 च्या परीक्षा 9, 11 आणि 13 मे ऐवजी 11, 15 आणि 17 मे रोजी होतील. 16 मे ऐवजी 2, 4 आणि 8 मे रोजी होणार आहे. सीए फायनल ग्रुप 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे ऐवजी 10, 14 आणि 16 मे रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com