करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2023) ऑफ इंडिया तर्फे CAच्या पुढील सेशनची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ICAI तर्फे नुकताच इंटर आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. आता CA November सेशनच्या परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. तसेच पुढील सेशनच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन शेड्युलही जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.
सीए फाऊंडेशन, इंटर आणि फायनल नोव्हेंबर सेशनच्या परीक्षेसाठी 2 ऑगस्ट 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख (ICAI CA Exam 2023) असेल. तर पात्र उमेदवार 30 ऑगस्ट 2023 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करु शकतात. तर दुरुस्तीसाठी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
असा करा अर्ज – (ICAI CA Exam 2023)
1. ICAI तर्फे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, CA फाऊंडेशन, इंटर आणि फायनल (2023) परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाई घेतली जाणार आहे.
2. उमेदवारांना icai.org या अधिकृत साईटवर जाऊन नोंदणी अथवा रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
3. ही रजिस्ट्रेशन लिंक 2 ऑगस्टपासून ऑफशिअल वेबसाईटवर ॲक्टिव्ह होईल. दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे.
काही महत्वाच्या तारखा/ परीक्षेचा कालावधी –
1. ICAI CA फाउंडेशन नोव्हेंबर 2023 परीक्षा 24, 26, 28 आणि 30 डिसेंबर रोजी आयोजित केल्या जातील. ICAI CA फाउंडेशन पेपर 1 आणि 2 ची परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या तीन तासांच्या तर पेपर 3 आणि 4 ची परीक्षा दुपारी 2 ते 4 या दोन तासांच्या कालावधीत (ICAI CA Exam 2023) घेण्यात येणार आहे.
2. सीए इंटरमिजिएट नोव्हेंबर 2023 च्या परीक्षेतील ग्रुप 1 चे पेपर 2, 4, 6 आणि 8 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तर ग्रुप 2 साठी ची परीक्षा 10, 13, 15 आणि 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. इंटरमिजिएट पेपरच्या परीक्षेचा कालावधी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत असा तीन तासांचा असेल.
3. CA फायनल ग्रुप 1 ची परीक्षा 1, 3, 5 आणि 7 नोव्हेंबर रोजी आणि ग्रुप 2 ची परीक्षा 9, 11, 14 आणि 16 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. पेपर 1 ते 5 आणि 7 व 8 हे पेपर दुपारी 2 ते 5 या तीन तासांच्या कालवधीत होतील. तर पेपर 6 हा 2 ते 6 या चार तासांच्या कालावधीत होईल. ICAI च्या वतीने ट्विट करून संपूर्ण डेटशीट जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com