करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या (IBPS Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने नुकतीच 3049 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती अंतर्गत तब्बल 3049 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि स्पेशल ऑफिसर्स (SO) पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 देण्यात आली होती पण आता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 28 ऑगस्ट 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
ग्राहकांच्या तक्रारी हाताळणे आणि ग्राहकांशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करणे यासह अनेक जबाबदाऱ्या PO ला सांभाळाव्या लागतात. त्यांना रोख प्रवाह, कर्जे, गहाणखत आणि आर्थिक प्रभारी देखील बनवले जाते. याव्यतिरिक्त, त्यांनी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर देखरेख करणे आवश्यक आहे. IBPS PO पदासाठी पात्रता काय (IBPS Recruitment 2023) आहे? किती रुपये पगार मिळू शकतो आणि अर्ज कसा करायचा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन
भरले जाणारे पद – PO / MT (परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी)
पद संख्या – 3094 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate Degree (Read PDF)
1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – परीक्षा
1. पूर्व परीक्षा
वेळ – 1 तास
गुण – 100
2. मुख्य परीक्षा
वेळ – 3 तास 30 मिनिटे
गुण – 225
या भरतीमधून विविध ११ बँकेत नोकरी मिळण्याची संधी आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन (IBPS Recruitment 2023) ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि अन्य बँकांचा समावेश आहे.
भरतीचा तपशील –
आवश्यक वय मर्यादा – (IBPS Recruitment 2023)
इच्छुक उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याचा/ तिचा जन्म ०२.०८.१९९३ पूर्वी झालेला नसावा आणि ०१.०८.२००३ नंतर झालेला नसावा. परंतु राखीव श्रेणीतील लोकांना भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
Category | Age Relaxation |
Scheduled Caste/Scheduled Tribe (SC/ST) | 5 years |
Other Backward Classes (OBC Non-Creamy Layer) | 3 years |
Persons with Disabilities (PWD) | 10 years |
Ex-Servicemen (Army personnel) | 5 years |
Widows/Divorced Women | 9 years |
Persons with Domicile of Jammu &Kashmir during the period of 1-1-1980 to 31-12-1989 | 5 years |
Persons affected by 1984 riots | 5 years |
Regular Employees of Union Carbide Factory, Bhopal retrenched from service(for MP state Only) | 5 years |
अर्ज फी –
SC/ST/PWD – 175/- रुपये
सर्वसाधारण प्रवर्ग – 850/- रुपये
मिळणारे वेतन –
IBPS PO ची बेसिक सॅलरी 36,000 रुपये असले तरी इतर भत्ते, एचआरए आणि इतर भत्ते धरून सुरुवातीचा इन हॅन्ड पगार तब्बल 52,000 ते 55,000 मिळतो.
असा करा अर्ज –
१) सर्वात आधी IBPS च्या अधिकृत पेजला भेट द्या – www.ibps.in
२)होमपेज वरील CRP PO/MT वर क्लीक करा
३)आता अधिसूचना देणाऱ्या लिंकवर क्लिक करा- म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर्स/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-XIII CRP PO/MT-XIII साठी सामान्य भरती
४) प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
५)आता ‘New Registration वर क्लीक करा
६)सर्व माहिती भरा आणि पेजच्या खाली सेव्ह आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा
७)अर्जाच्या या विभागात आवश्यक (IBPS Recruitment 2023) तपशीलानुसार छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा
८)आता तुमचे वैयक्तिक डिटेल्स, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव भरा. त्यानंतर, तुम्हाला सहभागी बँकांची प्राधान्य यादी भरावी लागेल.
९)तुमचा अर्ज पुन्हा एकदा चेक करा आणि काही चुका आढळल्यास एडिट करा.
१०)ऑनलाइन मोड, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग इत्यादीद्वारे अर्ज फी भरा.
११) आता सबमिट बटणावर क्लिक करा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com