IAS Love Story : या IAS ने दोन भेटीतच कृष्णाला केलं प्रपोज; वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयएएस अधिकाऱ्यांची लग्ने म्हणजे (IAS Love Story) चर्चेचा विषय. देशातील अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS अधिकाऱ्याची निवड करतात. यापैकी अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा फार थोड्या दिवसांत घटस्फोटदेखील होतो. आज आपण पुण्यात जन्मलेल्या एका IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी पाहणार आहोत; जीने कोणत्या अधिकाऱ्याशी लग्न न करता कलाकाराला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

IAS Love Story

कोण आहे ती IAS
पुण्यातील या IASने कोणत्या अधिकाऱ्याशी नाही तर कलाकाराशी लग्न केले आहे. या महिला IASचे नाव आहे स्मिता गेट अन् तिने ज्याच्याशी लग्न केले तो कलाकार आहे (IAS Love Story) नीतीश भारद्वाज. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. एका लग्न समारंभात दोघे एका कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. मग दोघांची प्रेमकथा तयार झाली. परंतु ही प्रेमकथा इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे.

IAS Love Story

पुण्याची स्मिता (IAS Love Story)
IAS स्मिता गेट यांचा जन्म पुण्यात झाला. पुणे शहरातील सेंट्रल स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून 12 वी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी आणि गरवारे कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्समधून समाजशास्त्रात एमए केले.

IAS Love Story

मालिकेतील श्री कृष्ण नितीश भारद्वाज 
नितीश भारद्वाज यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका मनोरंजन विश्वात अजरामर झाली आहे. श्री कृष्णाची भूमिका (IAS Love Story) साकारताना नितीश भारद्वाज आपल्या अभिनयाने घराघरांत पोहचले होते. स्मिता आणि नितीश या दोघांची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. मग दोन ते चार भेटींमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

IAS Love Story

2009 मध्ये झालं लग्न
नितीश भारद्वाज आणि स्मिता गेट यांचा विवाह 14 मार्च 2009 रोजी झाला. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. नितीश व स्मिता यांना जुळ्या मुली आहेत. देवयानी आणि (IAS Love Story) शिवरंजनी अशी त्यांची नावे आहेत. 2022 मध्ये नितीश भारद्वाज यांनी IAS स्मिता गेटशी घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते. त्याचे कारण त्यांनी दिले नव्हते. परंतु आम्ही 12 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com