HSC SSC Results 2023 : 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या नंतर जु्न्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस (HSC SSC Results 2023) शैक्षणिक काम बंद होते. या गोंधळात सुमारे सहा-सात दिवस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नव्हत्या. यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल विलंबाने लागेल अशी भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होती. परंतु आता मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता निकाल
विद्यार्थी बोर्डाच्या पुढील अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात –
1. mahresult.nic.in 
2. https://www.mahahsscboard.in
3. hscresult.mkcl.org
4. mahresults.org.in
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन दहावी आणि बारावी यापैकी अपेक्षित पर्याय निवडावा. त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर तपशील भरावा. त्यानंतर निकाल समोर येईल. विद्यार्थी निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेऊ शकतात.

इतक्या विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा (HSC SSC Results 2023)
महाराष्ट्रात दहावी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या काळात घेण्यात आल्या होत्या. तर तर 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोना (HSC SSC Results 2023) काळानंतर यंदा परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. इयत्ता दहावीच्या  जवळपास 15,77,256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींचा समावेश होता. 5033 परीक्षा केंद्रांमध्ये या परीक्षांचं आयोजन केलं होतं.  बारावीच्या परीक्षांसाठी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com