करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतीक्षा (HSC Results 2023) असणाऱ्या 12 वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यंदा राज्याचा 12वी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुणे, कोकण विभागाने दमदार कामगिरी केली असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
Result पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी बोलताना बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 2 वाजता राज्यभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
शाखानिहाय निकालाची टक्केवारी
शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : ९६.०९ टक्के
कला : ८४.०५ टक्के (HSC Results 2023)
वाणिज्य : ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के
विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
पुणे : ९३.३४ टक्के
नागपूर : ९०.३५ टक्के
औरंगाबाद : ९१.८५ टक्के
मुंबई : ८८.१३टक्के (HSC Results 2023)
कोल्हापूर : ९३.२८टक्के
अमरावती : ९२.७५टक्के
नाशिक : ९१.६६ टक्के
लातूर : ९०.३७टक्के
कोकण : ९६.०१टक्के
असा पहा निकाल – (HSC Results 2023)
ऑनलाईन निकाल कसा पाहाल?
1. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
2. निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.
3. होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.HSC Board Examination
4. तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
कसा चेक कराल निकाल?
1. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉग ऑन करा.
2. बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
3. तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
4. तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा. (HSC Results 2023)
5. एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
6. निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
SMSद्वारे असा पहा निकाल
1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.
2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
3. 57766 वर मेसेज सेंड करा. (HSC Results 2023)
4. तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
Maharesult.nic.in\
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com