HSC Exam 2023 : दुष्काळात तेरावा महिना; बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकच नाहीत; निकाल लांबणार?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहे. यातच (HSC Exam 2023) राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र त्यात आता दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे बारावीच्या 50० लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास बारावीच्या निकालास उशीर होण्याची शक्यता आहे.

उत्तरपत्रिका स्वीकारण्यास शिक्षकांचा नकार (HSC Exam 2023)

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. शिक्षकांच्या या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीचे इतिवृत्त न मिळाल्याने शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. सद्यस्थितीत बारावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांसह वाणिज्य संघटन आणि भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा पार पडली आहे. गेल्या सात दिवसांत या विषयांच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका महाविद्यालय आणि कस्टडी स्तरावर तपासणीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मात्र मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत उत्तरपत्रिका स्वीकारण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे.

‘शिक्षकांच्या बहिष्कारामुळे मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांनी बहिष्कारात सहभागी असल्याचे निवेदन राज्य (HSC Exam 2023) मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांना दिले. तसेच अन्य विषयांच्या नियामकांनीही बहिष्काराची निवेदने मंडळाकडे दिली आहेत’, अशी माहिती महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली.

काय आहेत मागण्या?

राज्यात सन 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांची 10, 20 आणि 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना (HSC Exam 2023) त्वरित लागू करावी, निवड श्रेणीसाठी 20 टक्क्यांची अट रद्द करावी आदी मागण्या शिक्षकांनी लावून धरल्या आहेत. तसेच वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी, अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, विना अनुदानितकडून अनुदानितमधील बदलीला दिलेली स्थगिती रद्द करावी, अशा मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com