HSC Exam 2023 : 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आज होणार जारी; पहा कसं करायचं डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2023) महत्त्वाची बातमी आहे. आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. बोर्डाकडूनच याबाबत माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे आव्हान बोर्डाने केलं आहे.

आज सकाळी 11 वाजल्यापासून College Log in मधून हे हॉल तिकिट उपलब्ध असणार आहेत. याशिवाय www.mahahssscboard.in या वेबसाईटवर तुम्हाला प्रवेशपत्रं मिळू शकतं. या (HSC Exam 2023) संदर्भात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

काही महत्वाच्या सूचना –

हॉल तिकीट ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/ प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशी सूचना बोर्डाने दिली आहे.

हॉल तिकीट मध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. (HSC Exam 2023)

तसेच हॉल तिकीट वरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक कनिष्ट महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे.

प्रवेशपत्रं हरवलं तर ‘हे’ करा – (HSC Exam 2023)

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून (HSC Exam 2023) त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बोर्डाची अधिकृत वेबसाईट – http://www.mahahsscboard.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com