करिअरनामा ऑनलाईन । आजकाल कॅरिअरच्या संधी (Full Stack Developer) बदलत चालल्या आहेत त्यामुळे तुम्हाला एकाच ठराविक गोष्टीशी निगडीत काम करण्याची गरज नाही. आवडी प्रमाणे आणि तुमच्या जवळ असलेल्या Skills नुसार तुम्ही करिअर निवडू शकता. जगात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, Age-Old कामांचा जमाना सोडून आपण आत्ता नवीन गोष्टींकडे वळत आहोत. आज आपण अशाच एका क्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत. जाणून घेऊया Full Stack Developer कोण असतात? त्याचं काम कसं चालतं? या क्षेत्रात करिअरची संधी कशी आहे याविषयी…
Full Stack Developer म्हणजे कोण?
एखाद्या Website च्या दोन्ही बाजू जबाबदारीने सांभाळणारा इंजिनीअर म्हणजे Full Stack Developer. Technical भाषेत सांगायचं झाल्यास Website चा Front End आणि Back End सांभाळणारा माणूस म्हणजे Full Stock Developer आहे.
Full Stack Developer चं काम काय आहे?
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास Full Stack Developer हा Websites सांभाळतो आणि Applications तयार करतो.
ज्यात Front आणि Back end ची जबाबदारी सांभाळणे हा महत्वाचा भाग आहे. या शिवाय APIs वर काम करणं किंवा येणारे अडथळे दूर करणं हा त्याच्या कामाचा भाग असतो .कंपनीच्या बाकी विभागांसोबत तो विविध प्रोजेक्ट्स वर काम करत असतो.
दिवसेंदिवस technology मध्ये बदल पाहायला मिळतात, त्यामुळे Full Stock Developer ला नेहमीच नवनवीन कल्पनांचा शोध घेत राहावं लागतं.
Full Stock Developer साठी करिअरच्या संधी खालील क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत –
1. Computer Software
2. Information Technology
3. Internet (Full Stack Developer)
4. Financial Services
5. Higher education
Full-Stack Developer जवळ या गोष्टी असाव्यात –
1. Front-End Development : इथे काम करणाऱ्या माणसाला font, colors, page,layout या गोष्टी कशा चालतात याची किमान जाणीव असावी. या सोबतच HTML, CSS, JavaScript ची इत्यंभूत माहिती असली पाहिजे.
2. Back-End Development : इथे एखाद्या website च्या मागे चालणाऱ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. जिथे विशेषकरून programming language जमली पाहिजे. इथे Paython, PHP, Ruby on Rails इत्यादींचा समावेश आहे.
3. Web Design : हा Full-Stack Development चा महत्वाचा भाग आहे. इथे तुम्हाला software हाताळता आले पाहिजेत जसे कि PhotoShop. या सोबतच backgrounds, audio, Video वर काम करता आलं पाहिजे.
4. Database Management : यामध्ये तुम्हाला website च्या संबंधित असलेले प्रश्न सोडवता आले पाहिजेत. सोबतच जी काही storage आहे ती योग्यपणे हाताळता आली पाहिजे.
जर का तुम्हाला Full-Stack Developer होण्याची इच्छा असेल तर खालील प्रमाणे programming language माहिती असणं भाग आहे:
1.Angular JS
2. AWS
3.CSS
4.PHP
5. MySQL
कसे बनाल Full Stack Developer?
Full Stack Developer जवळ computer science, computer engineering किंवा या संबंधित विषयांमध्ये पदवी असावी. पदवी सोबतच तुम्हाला या क्षेत्राची आवड असावी व आवश्यक कौशल्ये जोपासता यावीत ज्यामुळे ह्या क्षेत्रात प्रगती करणं सोपं जातं.
ही काही कॉलेजेस तुम्हाला पदवी मिळवून देतील – (Full Stack Developer)
1. Fergusson College, Pune
2. Ramnarain Ruia College, Mumbai
3. Mangalayatan University, Uttar Pradesh
4. C.V. Raman Global University, Orrisa
या कॉलेजेसची फीस साधारणपणे 60 हजार ते 70 हजारच्या आसपास असतात. प्रत्येक कॉलेज प्रमाणे मात्र ह्यात बदल होऊ शकतो. पगार विचारात घेतल्यास या कॉलेजेसकडून 9.50 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या Placements मिळवल्या जाऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com