How to Become Engineer in CPWD : केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कसं बनता येईल इंजिनिअर? इथे मिळले संपूर्ण माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सार्वजनिक बांधकाम (How to Become Engineer in CPWD) विभागाद्वारे दरवर्षी कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती केली जाते. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित केली जाते. आपल्या देशातील एका अहवालानुसार दरवर्षी 15 लाख विद्यार्थी अभियांत्रिकीमधून पदवी घेतात. यातील लाखो अभियांत्रिकी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदांसाठी दरवर्षी भरती केली जाते. जर तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता पदावर सरकारी नोकरी हवी असेल आणि अभियंता बनण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. PWD अभियंता होण्यासाठी पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती तुम्ही येथून मिळवू शकता.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) मध्ये SSC करते अभियंता पदांची भरती
CPWD म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करते. CPWD दरवर्षी कनिष्ठ अभियंता पदांची भरती करते. कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जबाबदार आहे. यावर्षी एसएससी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी) पदांसाठी भरती करणार आहे.

PWD अभियंता होण्यासाठी काय आहे पात्रता?
ज्या उमेदवारांना केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता (Engineer) व्हायचे आहे आणि एसएससी जेई भरतीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, उमेदवाराकडे दोन वर्षांच्या कामाच्या अनुभवासह संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असेल, तर ते देखील अर्ज करू शकतात.

आवश्यक वय मर्यादा –
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, पदांनुसार उमेदवाराचे कमाल वय 30/32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. कर्मचारी निवड आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अशी आहे PWD अभियंता निवड प्रक्रिया (How to Become Engineer in CPWD)
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होण्यासाठी उमेदवारांना प्रथम पेपर-1 (संगणक आधारित परीक्षा) परीक्षा द्यावी लागते. CBT नंतर, उमेदवारांना पेपर -2 लेखी परीक्षेला बसावे लागेल. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये यशस्वी होण्यासाठी, अनारक्षित प्रवर्गासाठी किमान 30 टक्के, OBC/EWS प्रवर्गासाठी 25 टक्के आणि SC/ST प्रवर्गासाठी 20 टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल. दोन्ही पेपरमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

किती असेल पगार –
PWD अभियंता हे पद गट ‘ब’ अंतर्गत येते. या पदासाठी (How to Become Engineer in CPWD) निवडलेल्या उमेदवारांना केंद्रीय वेतन आयोग (पे मॅट्रिक्स 7) आणि स्तर 6 अंतर्गत दरमहा रु.3,5400 ते 1,12,400 रुपये दिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com