How to Become Drone Pilot : कसं व्हायचं ड्रोन पायलट; कुठे घ्याल प्रशिक्षण?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी (How to Become Drone Pilot) जवळ येवून ठेपल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची माहिती करुन देत आहोत. तुम्ही इयत्ता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ड्रोन पायलट बनून या क्षेत्रात तुमचे नशीब आजमावू शकता. यासाठी तुम्हाला डीजीसीए (DGCA) मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला ड्रोन पायलट बनण्याचा परवाना मिळू शकेल.

तंत्रज्ञान क्षेत्रात ड्रोन उद्योग झपाट्याने विकसित झाला आहे आणि येत्या काही वर्षात तो वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे. काही वर्षापूर्वी ड्रोनचा वापर फारच मर्यादित होता, पण आता विवाह सोहळ्यांव्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्र, कृषी क्षेत्र, चित्रपट उद्योगात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. ड्रोनच्या माध्यमातून एकाच ठिकाणी बसून कमी वेळात जास्त काम आणि जास्त क्षेत्र कव्हर करता येते, आणि हे काम ड्रोन पायलट अगदी प्रभावीपणे पार पाडू शकतो.

असं बनू शकता ड्रोन पायलट (How to Become Drone Pilot)
जर तुमचेही ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही ते 10वी/12वी पूर्ण केल्या नंतर या क्षेत्रात काम सुरू करू शकता. ड्रोन पायलट होण्यासाठी सरकार प्रशिक्षणही देते.

प्रशिक्षण कुठे घ्याल?
ड्रोन पायलट होण्यासाठी तुम्हाला डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणासाठी संस्थेने ठरवून दिलेली फी जमा करून प्रवेश घेता येईल. यानंतर तुम्हाला ड्रोन तंत्रज्ञान समजून घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर उमेदवाराला (How to Become Drone Pilot) वैद्यकीय चाचणीस हजर रहावे लागते. या टप्प्यातील यशस्वी उमेदवारांना DGCA द्वारे प्रमाणपत्रे प्रदान केली जातात. ड्रोन पायलट किंवा ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही सरकारी वेबसाइट digitalsky.dgca.gov.in ला भेट देऊ शकता. प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवार या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात आणि चांगली कमाई करु शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com