करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही कमर्शियल (How to Become Commercial Tax Inspector) टॅक्स इन्स्पेक्टर पदावर सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. देशातील विविध राज्यातील सरकारांच्या वाणिज्य कर अधीनस्थ सेवा विभागांमध्ये व्यावसायिक कर निरीक्षकांच्या पदांसाठी भरती केली जाते. या पदासाठी आवश्यक पात्रता आणि निकषांबद्दल आम्ही इथे माहिती देत आहोत.
सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. देशाच्या सरकारी विभागात असेच एक पद आहे ते म्हणजे ‘कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर’चे. विविध राज्य सरकारांच्या वाणिज्य कर अधीनस्थ सेवा विभागात व्यावसायिक कर निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. ही पोस्ट ‘ग्रुप 2’ अंतर्गत येते. तुम्हालाही या पोस्टवर नोकरी मिळवायची असेल, तर तुम्ही त्याची संपूर्ण प्रक्रिया येथून जाणून घेऊ शकता.
अशी होते निवड (How to Become Commercial Tax Inspector)
कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागते. वेगवेगळ्या राज्यांनुसार, लेखी परीक्षेशिवाय भाषा परीक्षा द्यावी लागते. सर्व प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाते.
ही पात्रता असणे आवश्यक
कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारा ज्या राज्याचा रहिवासी आहे; तेथील प्रादेशिक भाषेचे ज्ञान उमेदवारास असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयमर्यादा
कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे असावे. राज्यांनुसार वयोमर्यादेत फरक असू शकतो. राज्यांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाते.
किती मिळतो पागार
आयकर निरीक्षक पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना दरमहा सुमारे ४० हजार रुपये वेतन दिले जाते. यासह इतर सरकारी सुविधाही दिल्या जातात. आयकर अधिकाऱ्याचा पगार देखील त्यांचे पद काय आहे आणि कोणत्या राज्यात त्यांची नेमणूक झाली यावर सुद्धा अवलंबून आहे. निवड झालेल्या उमेदवारांना राज्यांच्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाते.
परीक्षा –
कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एसएससी ( SSC ) परीक्षा द्यावी लागते. एसएससी ( SSC ) दरवर्षी उमेदवारांना आयकर निरीक्षक होण्यासाठी सीजीएल ( CGL ) परीक्षा घेते. ही परीक्षा दोन टप्प्यात उमेदवाराला द्यावी लागते , त्यानंतर उमेदवारास आयकर निरीक्षक पद मिळू शकते.
पहिला टप्पा –
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर होण्यासाठी एसएससी ( SSC ) परीक्षा हा पहिला टप्पा आहे, या परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण होणे खूप अनिवार्य आहे. यामध्ये सर्व उमेदवारांना २०० गुणांची चाचणी सोडविण्यासाठी २ तासांचा अवधी देण्यात आला आहे आणि सर्व प्रश्न multiple choice प्रकारचे असतात. या (How to Become Commercial Tax Inspector) परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना, जे उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना दुसऱ्या पेपरसाठी बोलावण्यात येतात.
दुसरा टप्पा –
जे विद्यार्थी पहिल्या पेपरमध्ये उत्तीर्ण झाले त्यांनाच फक्त दुसऱ्या पेपरसाठी बोलाविण्यात येते. या परीक्षेत उमेदवाराला ४ पेपर्स सोडवायचे असतात ज्यात सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी इत्यादीवर आधारित प्रश्न उमेदवारांना विचारले जातात. जेव्हा उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होतात, तेव्हा त्यांना पुढील प्रक्रियेसाठी सांगितले जाते ज्या अंतर्गत उमेदवाराची मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते.
मुलाखत फेरी – (How to Become Commercial Tax Inspector)
मुलाखतीच्या वेळी उमेदवाराची सर्व आवश्यक आणि अनिवार्य कागदपत्रांची पडताळणीही केली जाते. उमेदवाराच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अडचण नसल्यास, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर होण्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. आयकर निरीक्षक बनण्याच्या प्रक्रियेखाली फॉर्म वगैरे भरता तेव्हा आपल्या कागदपत्रांची सर्व माहिती योग्यप्रकारे द्या कारण आपण कोणत्याही प्रकारच्या चुकीची माहिती दिली तर आपली निवड रद्द केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त मुलाखत दरम्यान, उमेदवाराच्या मानसिक स्वरूपाचे मूल्यांकन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून केले जाते. उमेदवारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे कुशलतेने द्यावीत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com