Hotel Management Admission 2024 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Hotel Management Admission 2024) संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी येथे 3 वर्षाच्या बी.एस.सी. पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दि. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

बी. एससी. हॉस्पिटलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स
बी. एससी. हॉस्पिटलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन हा ३ वर्षे कालावधी तसेच फूड प्रॉडक्शनमध्ये पदविका, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये पदविका, फूड अँड बेवरेज सर्व्हिसमध्ये (Hotel Management Admission 2024) पदविका या दीड वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त १०+२ प्रणालीमध्ये कोणत्याही विद्याशाखेमध्ये ४० टक्के गुण मिळवून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अंतिम पदवी प्रदान करण्याकरिता अभ्यासक्रमाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मान्यता राहील.

प्राधान्य तत्त्वावर प्रवेश (Hotel Management Admission 2024)
पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादेची अट नसून पदविका अभ्यासक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ए-१६०, कंबर तलाव जवळ, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान, विजापूर रोड, सोलापूर या पत्त्यावर अथवा ९८९०५६६९९८, ९७६७२५७०२१ किंवा ९३७३०५०७०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com