Home Guard Bharti 2024 : राज्यात लवकरच होणार तब्बल 9 हजार होम गार्ड जवानांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची इच्छा उराशी (Home Guard Bharti 2024) बाळगलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. गृहरक्षक दल (Home Guard) अधिकाधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यात रिक्त असलेल्या 9 हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे; अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त २०० जागा लवकरच भरण्यात येतील, असेही ते म्हणाले. ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भरती संदर्भातील ही मोठी माहिती दिली आहे.

मानधन वाढीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर
रितेशकुमार पढे म्हणाले, राज्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून (Home Guard Bharti 2024) गृहरक्षक दलाचे जवान रात्रंदिवस काम करत असतात त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने गृह खाते सकारात्मक आहे. गृहरक्षक दलातील जवानांच्या मानधन वाढीबाबतचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे. सध्या त्यांना प्रती दिवस 670 रुपये मानधन मिळते. यामध्ये कमाल वाढ करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल; असेही ते म्हणाले.

गृहरक्षक दलात 55 हजार पदे मंजूर (Home Guard Bharti 2024)
सध्या राज्यात गृहरक्षक दलाची ५५ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील रिक्त ९ हजार पदांच्या भरतीबाबतही शासन स्तरावर लवकर निर्णय अपेक्षित आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही रितेशकुमार यांनी सांगितले.
गृहरक्षक दलाचे नूतन महासमादेशक तथा अप्पर पोलिस महासंचालक रितेशकुमार कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भरती संदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. या भरतीमुळे बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com