मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुमूळे देशावर मोठे संकट आले आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. अशात आरोग्य विभागाला कर्मचार्यांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील आरोग्य विभागातील जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
गेली अनेक वर्ष आरोग्य विभागाची पंद रिक्त आहेत. त्यातच आता राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे.
दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहे. “आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
नोकरी आणि करिअर विषयक सर्व महत्वाचे अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
visit : www.careernama.com