आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ! थेट अधिकाऱ्यांकडून “MPSC”च्या अभ्यासाचे मार्गदर्शन ; वाचा काय आहे बातमी

करिअरनामा ऑनलाइन – ऑनलाईन आम्हीं समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने राज्यसेवा -2019 साली पास झालेल्या गॅझेटेड अधिकाऱ्यांनी मिळून “साथी – मेंटोर्शिप प्रोग्राम”(Sathi- MPSC Mentorship Programme) सुरू केला आहे.

दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लाखो विद्यार्थी पुण्या – मुंबई सारख्या ठिकाणी येतात त्यात ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते पैसे मोजून मार्गदर्शनपर क्लासेस वगैरे लावू शकतात. परंतु गाव – खेड्यातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी पुण्यातील महागडी क्लासेस करू शकत नाहीत. यांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन देखील मिळत नाही.

त्यामुळे या लोकांनी करायचं काय ? अशा गावातच राहून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम यशस्वी अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.ज्यामध्ये MPSC 2019 मध्ये निवड झालेले अधिकारी अशा विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतील. तयारीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या सोबत असतील आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करतील. अभ्यासासाठी कुठली resources वापरावीत, अभ्यासाचे नियोजन,time management कशी असावी, question paper analysis, mains ची, written papers ची तयारी, इंटरव्यू या सर्व गोष्टींमध्ये निवड झालेले अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील. हा उपक्रम पूर्णतः मोफत असेल. सदरील उपक्रमासाठी प्रवेश परीक्षा आहे दिनांक 5 जूनला सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.त्यामूळे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच या उपक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या मित्र – मैत्रिणींना देखील जरूर कळवा.असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले आहे.

तसेच 2019 बॅचचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिली की “मागच्या दोन महिन्यापासून या उपक्रमाची आम्ही तयारी करत आहोत.त्याकामी 25 अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे जी या अशा शंभर विद्यार्थ्यांना निवडून त्यांना या संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन देण्याच काम करेल. यामागे आमचा शुद्ध हेतू हाच आहे की या सगळ्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शास्त्र – शुद्ध मार्गदर्शन मिळावं.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com